पाकिस्तानात स्मार्ट लॉकडाऊन; दुकाने, महामार्ग बंद, लग्न सोहळ्यांवर बंदी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन तुटवडय़ामुळे पाकिस्तानपुढे ऊर्जा संकट उभे राहिले आहे. यावर उपाय म्हणून पाकिस्तान सरकारने देशात दोन दिवसांचा ‘स्मार्ट लॉकडाऊन’ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात दुकाने, महामार्ग बंद ठेवण्यात येणार असून लग्न समारंभांवरही बंदी घालण्यात येणार आहे.

आठवडय़ातून दोन दिवस हा लॉकडाऊन असेल. त्याचा कालावधी शनिवारी मध्यरात्री ते रविवारी मध्यरात्रीपर्यंत असेल. शरीफ सरकारने याबाबत प्रस्ताव तयार केला आहे. राज्य सरकारे त्यास अनुकूल असल्यास 4 एप्रिलपासून लॉकडाऊन लागू होईल.

स्मार्ट लॉकडाऊन म्हणजे काय?

स्मार्ट लॉकडाऊनमध्ये एका वेळी सर्व काही बंद केले जात नाही. ज्यामुळे समस्या निर्माण झाली आहे किंवा वाढू शकते त्यावरच निर्बंध आणले जातात.

हिंदुस्थानात चिंता वाढली

‘हिंदुस्थानकडे पुरेसा इंधन साठा आहे. लॉकडाऊन लागणार नाही,’ असे केंद्र सरकारकडून वारंवार सांगितले जात असले तरी जगातील वास्तव वेगळे आहे. फिलिपिन्स, म्यानमार, बांगलादेश, व्हिएतनामने एनर्जी लॉकडाऊन लावले आहे, तर श्रीलंकेत पेट्रोल-डिझेलचे रेशनिंग सुरू केले आहे. यामुळे हिंदुस्थानात काय होणार याची चिंता वाढली आहे.

Comments are closed.