दोन वर्षांची बंदी अपुरी, आयपीएलमधील माघारीवर गावसकरांचा हल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयपीएलमधून शेवटच्या क्षणी नाव मागे घेणाऱया खेळाडूंवर कडक शब्दांत टीका करत बीसीसीआयला सध्याच्या शिक्षण पद्धतीचा पुनर्विचार करण्याचा सल्ला अनुभवी हिंदुस्थानी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी दिला आहे. आयपीएलला धडा, दाखवणाऱया खेळाडूंना दोन वर्षांचा बंदी कालावधी पुरेसा नसल्याचे करू नका व्यक्त करत शिक्षण अधिक गंभीर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

बंदीचा धाकच नाही

दोन वर्षांचा बंदी कालावधी हा खेळाडूंना रोखण्यासाठी अपुरा आहे. नियमांचा खरा प्रभाव तेव्हाच पडेल जेव्हा त्याचा खेळाडूंच्या आयपीएल कारकीर्दीवर गंभीर परिणाम होईल. त्यांनी नमूद केले की, इतर स्पर्धांमधील मोठय़ा करारांमुळे काही खेळाडू आयपीएलला दुय्यम मानत आहेत. त्यांच्यावर बंदीचा धाकच उरला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

बेन डकेट प्रकरणाने पेटली चर्चा

बेन डकेटने आयपीएल 2026 मधून माघार घेतल्याने वादाला तोंड फुटले. दिल्लीने त्याला दोन कोटी रुपयांत खरेदी केले होते, मात्र ‘अॅशेस’ मालिकेनंतरचा थकवा आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे कारण देत त्याने स्पर्धेतून माघार घेतली.

बीसीसीआयसमोर मोठे आव्हान

गावसकरांच्या वक्तव्यानंतर आता बीसीसीआयसमोर खेळाडूंशी असलेली बांधिलकी जपायची की संघांचे नुकसान टाळायचे, असा प्रश्न पडलाय. पण आयपीएलची प्रतिष्ठा टिकवायची असेल तर नियमांना आता खऱया अर्थाने ‘दात’ द्यावे लागतील.

Comments are closed.