IPL 2026 सुरू होताच अजिंक्य रहाणेच्या दुखापतीमुळे केकेआरची चिंता वाढली? कर्णधाराने स्वतः दिली अपडेट

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आधीच दुखापतींच्या समस्यांशी झुंजत आहे. IPL 2026 सुरू होण्यापूर्वीच अनेक खेळाडू संघाबाहेर झाले आहेत, तर काही अजूनही पूर्णपणे फिट नाहीत. अशातच मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला दुसऱ्या डावात मसल क्रॅम्पमुळे मैदान सोडावे लागले, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

रहाणेच्या अनुपस्थितीत भारताचा अष्टपैलू खेळाडू रिंकू सिंग याने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. IPL 2026 सुरू होण्यापूर्वीच रिंकूला उपकर्णधार बनवण्यात आले होते. मुंबई इंडियन्सने दिलेल्या 221 धावांचा पाठलाग करताना चौथ्या षटकानंतर रहाणे मैदानावर खाली बसला नंतर त्याला उपचार देण्यात आले, मात्र 37 वर्षीय हा खेळाडू पुढे मैदानात परतू शकला नाही.

क्रॅम्पमुळे काही मिनिटे मैदानावरच पडून राहिल्यानंतर संघातील खेळाडूंनी त्याला उठण्यास मदत केली. बाहेर जाण्यासाठी त्याने खेळाडूंचा आधार घेतला आणि नंतर तो स्वतः चालत गेला, मात्र त्याला लंगडत चालावे लागत होते.

पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये रहाणेने आपल्या दुखापतीबाबत माहिती देताना सांगितले की, त्याच्या दोन्ही पिंडऱ्यांमध्ये तीव्र क्रॅम्प्स आले होते. तो म्हणाला, “आता मी ठीक आहे, फक्त दोन्ही पिंडऱ्यांमध्ये खूप क्रॅम्प्स होते. मुंबईच्या उष्णतेमध्ये असे होणे सामान्य आहे आणि लवकरच मी बरा होईल.”

सामन्याच्या निकालाबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबई इंडियन्सने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. 220 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या सलामी जोडीने रोहित आणि रिकल्टन यांनी संघाला आक्रमक सुरुवात दिली. रोहितने 38 चेंडूत 78 तर रिकल्टनने 43 चेंडूत 81 धावा केल्या, या भागीदारीमुळे संघान सामना खिश्यात घातला.

तत्पूर्वी, केकेआर पहिल्या डावात फलंदाजी करताना 20 षटकात 220 धावा केल्या, ज्यामध्ये अजिंक्य रहाणे (67) आणि अंगकृश रघूवंशी (51) यांनी अर्धशतके झळकावली. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला.

Comments are closed.