Mahindra BE6 खरेदी करण्याचे स्वप्न साकार! ईएमआय 25,000 पेक्षा कमी; डाउन पेमेंटचे गणित जाणून घ्या

- महिंद्राच्या इलेक्ट्रिक कार BE6 ला चांगली मागणी आहे
- ही कार फक्त 23,931 रुपयांच्या EMI सह मिळू शकते
- डाउन पेमेंट आणि गणनेबद्दल जाणून घ्या
देशातील अग्रगण्य ऑटोमोबाईल उत्पादकांपैकी एक महिंद्रा कंपनी भारतीय बाजारपेठेत विविध विभागांमध्ये वाहनांची विक्री करते. या कंपनीकडून उपलब्ध असलेल्या मॉडेल्समध्ये, इलेक्ट्रिक एसयूव्ही 'महिंद्रा BE6' देखील खरेदीसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही ही कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. 5 लाख रुपयांचे डाउन पेमेंट भरल्यानंतर, ही कार घरी आणण्यासाठी तुम्हाला किती ईएमआय भरावा लागेल हे तपशीलवार जाणून घेऊया.
महिंद्रा BE6 किंमत
महिंद्रा कंपनीच्या BE6 च्या 'बेस व्हेरिएंट'ची किंमत 18.90 लाख रुपये आहे. जर ही कार दिल्लीत खरेदी केली तर तिची ऑन रोड किंमत अंदाजे 19.87 लाख रुपये आहे.
मारुती स्विफ्ट वि टाटा पंच: एक हॅचबॅक आहे आणि दुसरी एसयूव्ही आहे; पण किंमत, वैशिष्ट्ये आणि इंजिनच्या बाबतीत कोणती कार सर्वोत्तम आहे?
5 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर ईएमआय
तुम्ही या कारचे 'बेस व्हेरिएंट' विकत घेतल्यास, बँक तुम्हाला 'एक्स-शोरूम' किंमतीच्या आधारे वित्तपुरवठा करेल. परिणामी, 5 लाखांचे 'डाऊन पेमेंट' केल्यानंतर, तुम्हाला अंदाजे 14.87 लाख रुपयांची उर्वरित रक्कम बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात घ्यावी लागेल. बँकेने तुम्हाला 9% व्याजाने आणि सात वर्षांच्या कालावधीसाठी 14.87 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केल्यास, तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी केवळ 23,931 रुपये प्रति महिना EMI भरावा लागेल.
या कारची एकूण किंमत किती असेल?
जर तुम्ही बँकेकडून 14.87 लाख रुपयांचे कार कर्ज सात वर्षांच्या कालावधीसाठी आणि 9% व्याजदराने घेतले तर तुम्हाला संपूर्ण सात वर्षांच्या कालावधीसाठी 23,931 रुपये प्रति महिना EMI भरावा लागेल. या सात वर्षांमध्ये, महिंद्रा BE6 वर तुम्हाला अंदाजे 5.22 लाख रुपये जास्तीचे व्याज द्यावे लागेल. परिणामी, या कारची एकूण किंमत, ज्यामध्ये 'एक्स-शोरूम' किंमत, 'ऑन-रोड' शुल्क आणि भरलेले व्याज समाविष्ट आहे, अंदाजे 25.10 लाख रुपये असेल.
इलेक्ट्रिक टू-व्हीलर विक्री: 'या' कारणामुळे मार्च 2026 मध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलरची विक्री वेगाने वाढेल
ही कार कोणाशी स्पर्धा करेल?
Mahindra BE6 ला बाजारात अनेक SUV कडून स्पर्धेला तोंड द्यावे लागत असले तरी, त्याच्या थेट प्रतिस्पर्ध्यांमध्ये Hyundai Creta Electric, Tata Curvv EV, MG Windsor EV आणि Vinfast VF6 सारख्या इलेक्ट्रिक SUV चा समावेश आहे.
Comments are closed.