…तर दुबई उद्ध्वस्त होऊ शकते, अमेरिकन अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांचा गंभीर इशारा
प्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांनी संयुक्त अरब अमिरातीला सुरू असलेल्या युद्धापासून लांब राहण्याचा कडक इशारा दिला आहे. यूएई जर या संघर्षात सामील झाले, तर दुबई आणि अबू धाबी सारख्या शहरांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी ते बोलत होते.
दुबई आणि अबू धाबी ही पर्यटनासाठी आणि श्रीमंतांसाठी बनवलेली शहरे आहेत. ही काही लष्करी तटबंदी असलेली क्षेत्रे नाहीत. जर यूएई युद्धात उतरले, तर ही शहरे सहजपणे उद्ध्वस्त केली जाऊ शकतात. अशा परिस्थितीत युद्धात सामील होणे म्हणजे दुबईसारख्या शहराच्या अस्तित्वाचा मूळ उद्देशच संपवण्यासारखे आहे, असे जेफ्री सॅक्स म्हणाले. यावेळी त्यांनी ‘अब्राहम करारा’वरून आखाती देशांवर टीका केली आहे.
इस्रायल आणि अमेरिकेची बाजू घेणे हे अमिरातीसाठी विनाशाला निमंत्रण देण्यासारखे आहे. हे देश केवळ अमेरिकेच्या संरक्षणावर अवलंबून आहेत, ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे, असे ते म्हणाले. हेन्री किसिंजर यांच्या प्रसिद्ध वाक्याचा दाखला देत ते म्हणाले, अमेरिकेचा शत्रू असणे धोकादायक आहे, पण अमेरिकेचा मित्र असणे हे जीवघेणे ठरू शकते.
जेफ्री सॅक्स यांनी यूएईला सल्ला दिला आहे की, त्यांनी स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे आणि एका हरलेल्या डावावर अधिक गुंतवणूक करणे थांबवावे. सद्यस्थिती ओळखून अमिरातीने आपला बचाव करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
इराणचे बुरुज ढासळले; अमेरिकन सैन्यानं मोठ्या तळांना उद्ध्वस्त केलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना इराणने चोख प्रत्युत्तर दिले आहे. आखातातील अमेरिकन तळांवर इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले तीव्र केले आहेत. तसेच इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने आखातातील देशांना तंबीही दिली. आपल्या जमिनीवरील अमेरिकन लष्करी तळांचा वापर इराणवर हल्ला करण्यासाठी होऊ देऊ नये. तसे झाल्यास, तो देश थेट आक्रमणात सामील असल्याचे मानले जाईल आणि त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इराणने दिला. त्यानंतर जेफ्री सॅक्स यांनीही दुबई, अबू धाबीचा इशारा दिला.
Iran War – आम्ही इराणचे तेल तर घेऊच, पण खार्ग बेटही ताब्यात घेणार; ट्रम्पची इराणला धमकी
Comments are closed.