उत्पन्नवाढीसाठी झेडपीच्या मालमत्ता भाड्याने देणार; ठाणे जिल्हा परिषदेचा 116 कोटींचा अर्थसंकल्प सादर
ठाणे जिल्हा परिषदेचा ११६ कोटी ९९ लाखांचा मूळ अर्थसंकल्प आज जाहीर करण्यात आला. यंदा जिल्हा परिषदेस मोर आर्थिक नियोजनाचे मोठे आव्हान उभे ठाकले असल्यामुळे उत्पन्नवाढीसाठी जिल्हा परिषदेच्या स्थावर मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे असा निर्णय झाल्यास भविष्यात जिल्हा परिषदेचे गेस्ट हाऊस, अनेक मैदाने तसेच शासकीय इमारतीतील तळमजल्यावरील जागा आदी स्थावर मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
ठाण्यातील बी.जे. हायस्कूल येथे आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रणजीत यादव यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. ग्रामीण भागातील शासकीय कामकाजात जिल्हा परिषदेची महत्त्वाची भूमिका असते. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण क्षेत्राची व्याप्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. सर्वांगीण ग्रामीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सेवा, जल सुरक्षा व शाश्वत कृषी, सामाजिक सक्षमीकरण आणि डिजिटल पारदर्शक प्रशासन या पाच प्रमुख तत्त्वांवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.
शहापूर पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात
झेडपीच्या शाळातील विद्यार्थांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी तसेच गुणवत्तावाढीसाठी नावीन्यपूर्ण योजना ‘मिशन भरारी’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत शहापूर तालुक्यातील यशस्वी स्कॉलरशिप परीक्षा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रणजीत यादव यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मागील तीन वर्षांचा संकल्प
२०२४ – १०४ कोटी ६६ लाख
२०२५ – १०८ कोटी ९३ लाख
२०२६ – ११६ कोटी ९९ लाख
निधीची तरतूद
शिक्षण विभाग ११.३६ कोटी
इमारत व दळणवळण १९.८७ कोटी
कृषी ३.७४ कोटी
पशुसंवर्धन ३.७२ कोटी
आरोग्य ३. ७८ कोटी
ग्रामपंचायत मुद्रांक हिस्सा ३७.५० कोटी
पाटबंधारे व जलसंधारण २.४८ कोटी
पाणीपुरवठा २ कोटी
ठाण्याच्या अर्थसंकल्पीय चर्चेत मापात पाप; वेळेची मर्यादा ओलांडल्याने आज पुन्हा महासभा
महापालिकेच्या अर्थसंकल्पीय महासभा तब्बल दोन दिवस चालूनही पूर्ण होऊ शकलेली नाही. ज्येष्ठ नगरसेवकांनी वेळेची मर्यादा ओलांडल्याने ही बैठक शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत चालली. दरम्यान सोमवारी पुन्हा महासभेचे आयोजन करण्यात आले असून ठाणे पालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेत मापात पाप झाल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली.
ठाणे महापालिकेचा ६ हजार २२१ कोटी १२ लाखांचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला. बुधवारी आयोजित केलेल्या महासभेच्या सुरुवातीच्या सत्रात मोजक्याच नगरसेवकांनी आपली मते मांडली, यावर उपाय म्हणून दुसऱ्या सत्रात प्रत्येक नगरसेवकाला २० मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली. मात्र शुक्रवारी सायंकाळी काही ज्येष्ठ नगरसेवकांनी ही मर्यादा धाब्यावर बसवत जवळपास तासन्तास भाषणे ठोकली. त्यामुळे चर्चा लांबत जाऊन महासभा मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत चालली.
Comments are closed.