देश विदेश – अभिनेता विजय दोन मतदारसंघांतून निवडणूक लढणार
दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता विजय याने स्थापन केलेला टीव्हीके पक्ष तामीळनाडू विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. स्वबळावर निवडणूक लढवत असलेल्या टीव्हीकेने रविवारी आपल्या 234 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. टीव्हीकेचा प्रमुख असलेला अभिनेता विजय हा दोन विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहे. तामीळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत विजय याच्या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. विजय हा स्वतः त्रिची पूर्व आणि चेन्नईमधील परम्बूर विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहे.
इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत आत्महत्या
मधला प्रदेशातील शिवपुरी जिह्यात एका 22 वर्षीय तरुणाने इन्स्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान आत्महत्या केली. मनोज रजक असे या तरुणाचे नाव आहे. शेवटच्या क्षणी त्याने ऑनलाईन असलेल्या मित्रांसमोर हात हलवला तसेच, फ्लाइंग किस केले. तो जवळपास 14 मिनिटे लाईव्ह होता. पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू केला आहे.
ईपीएफओमध्ये काम करण्याची संधी
कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने 153 पदांची भरती जाहीर केली आहे. यात मुख्य पदे म्हणजे लोअर डिव्हिजन क्लार्क (एलडीसी) आणि ज्युनियर सेव्रेटरीअट असिस्टंट (जेएसए). दोन्ही पदांसाठी दहावी पास उमेदवार पात्र आहेत. ही पदे कार्यालयीन कामे, दस्तऐवज हाताळणे आणि संगणकावर काम करण्यासाठी आहेत. उमेदवाराला संगणक चालवण्याचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे.
Comments are closed.