हाँगकाँगविरुद्ध विलियम्सकडे हिंदुस्थानच्या नजरा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानी फुटबॉल संघ मंगळवारी एएफसी आशिया चषक पात्रता स्पर्धेतील आपल्या शेवटच्या आणि औपचारिक सामन्यात हाँगकाँगचा सामना करणार आहे.

ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या रायन विलियम्सवर सर्वांच्या नजरा खिळल्या असतील. दोन्ही संघ आधीच पुढील फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले असल्याने जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत फिफा रँकिंग गुण मिळवणे आणि भविष्यासाठी संघबांधणी मजबूत करणे  हा दोन्हींचा उद्देश असेल.

संघाचे एकूण प्रदर्शन अपेक्षेप्रमाणे झाले नसले तरी विलियम्सचा बहुप्रतीक्षित पदार्पण सामना हिंदुस्थानी संघासाठी नव्या अध्यायाची सुरुवात मानला जात आहे. या सामन्यामुळे जवळपास दशकानंतर शहरात आंतरराष्ट्रीय फुटबॉलचे पुनरागमन होणार आहे. हिंदुस्थानी फुटबॉलमधील एक महत्त्वाचे केंद्र असलेल्या या राज्यात स्थानिक प्रेक्षक मोठय़ा संख्येने सामने पाहण्यासाठी हजेरी लावतात.

हाँगकाँगविरुद्ध दमदार कामगिरी करत या मोहिमेचा सकारात्मक शेवट करण्याचा हिंदुस्थानी संघाचा प्रयत्न असेल. अलीकडे मुख्य प्रशिक्षक खालीद जमील आणि काही खेळाडूंना केरळ फुटबॉल संघाकडून स्टेडियम मालकांना अनिवार्य सुरक्षा ठेव रक्कम न दिल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला होता; मात्र ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या (एआयएफएफ) हस्तक्षेपानंतर हा वाद मिटला. गुणतालिकेत तळाशी राहण्याची शक्यता असल्याने, विजयाविना स्पर्धा संपवण्याची नामुष्की टाळण्यासाठी हिंदुस्थानी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल. 32 वर्षीय विलियम्सचा जन्म पर्थ येथे झाला असून, तो या सामन्यात खेळताना दिसू शकतो.

Comments are closed.