एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार? खडसेंसह कन्येवर गुन्हा दाखल, 25 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाची तक्रार

जळगाव: खरेदी खातामध्ये खाडाखोड करून एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी महार वतनाची आपली जमीन त्यांच्या मुलीच्या नावे लाऊन घेतल्याचा आरोप करत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मानपूर गावातील चमेली बाई तायडे यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासह त्यांच्या कन्या शारदा चौधरी यांच्या विरोधात बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

खडसे (Eknath Khadse) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर एबीपी माझाशी बोलताना एकनाथ खडसे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असून या व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नाही,आपल्या मुलीचा हा व्यवहार आहे, यामधे मुलीने जी जमीन खरेदी केली आहे. तो खासगी व्यवहार असून, ही जमीन महार वतनाची नसून १०१ वर्गवारीची आहे. या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या गेल्या असताना चमेली बाई तायडे यांचीच पंचवीस वर्षांनंतर तक्रार का?, तर या मागे सूड बुद्धीचे राजकारण आहे, त्यामागे आमदार चंद्रकात पाटील या लोकांना प्रोत्साहन देऊन आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आपण महसूल मंत्री राहिलो आहेत, त्यामुळे सगळे कायदे आपल्याला कळत आहेत,या व्यवहारामध्ये कोणताही गैर व्यवहार झालेला नाही, सर्व कायदेशीर बाबी पाळून ही खरेदी करण्यात आली असून त्याकाळात असलेल्या रेडी रेक्नर दरानुसार ही जमीन खरेदी करण्यात आली आहे. आपल्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे पोलिसांवर दबाव तंत्राचा वापर करून दाखला करण्यात आले असले तरी आपण या विरोधात न्यायालयात दाद मागणार असून त्यात आपल्याला यश मिळेल असा विश्वास ही खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केला आहे.

राजकीय षडयंत्राचा आरोप आणि सूडबुद्धीचे राजकारण

या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना एकनाथ खडसे यांनी थेट आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “आपल्याला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले आहे,” असा दावा खडसे यांनी केला. २५ वर्षांपूर्वी झालेल्या व्यवहारावर आता तक्रार होणे, हेच मुळात संशयास्पद असून पोलिसांवर राजकीय दबाव आणून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधक जुन्या प्रकरणांना उकरून काढून आपली राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

कायदेशीर लढाईचा पवित्रा आणि न्यायालयावर विश्वास

खडसे यांनी पुढे स्पष्ट केले की, आपण दीर्घकाळ महसूल मंत्री म्हणून काम पाहिले असल्याने जमिनीचे सर्व कायदे आणि तांत्रिक बाबी आपल्याला अवगत आहेत. त्यामुळे या व्यवहारात कोणतीही बेकायदेशीर कृती झालेली नाही. “रेडी रेकनरच्या दरानुसार आणि सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करूनच हा व्यवहार झाला आहे. खोट्या तक्रारींच्या आधारे दाखल झालेल्या या गुन्ह्याविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत,” असे खडसे यांनी सांगितले.

आणखी वाचा

Comments are closed.