Iran US Israel War – इराणहून हिंदुस्थानकडे येणाऱ्या विमानावर अमेरिकेचा हल्ला, 1 एप्रिलला दिल्लीत होणार होतं दाखल
इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये गेल्या महिन्याभरापासून युद्ध सुरू आहे. 28 फेब्रुवारीला सुरू झालेल्या युद्धामुळे आखातातील देशही होरपळून निघाले असून या युद्धाच्या झळा जगभरातील देशांनाही बसत आहेत. यामुळे जगातील अनेक प्रमुख देशांनी हे युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. तरीही दोन्ही बाजूने तुफान हल्ले सुरू आहेत. अशातच अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये इराणच्या महान एअरलाईन्सचे एक विमान निकामी झाल्याचे वृत्त आहे.
इराणचे हे विमान आवश्यक वैद्यकीय साहित्य आणि मदत सामग्री घेण्यासाठी दिल्लीला येणार होते. एक एप्रिल रोजी हे विमान दिल्लीमध्ये दाखल होणार होते, मात्र तत्पूर्वी सोमवारी मशहद विमानतळावर झालेल्या अमेरिकन हवाई हल्ल्यात या विमानाचे नुकसान झाले आहे. यामुळे हिंदुस्थानकडून मानवतावादी मदत आणण्याच्या मोहिमेत अडथळा निर्माण होऊ शकतो, असा दावा इराणी अधिकाऱ्यांनी केला आहे. ‘एनडीटीव्ही’ने याबाबत वृत्त दिले आहे.
Comments are closed.