Hanuman Jayanti 2026: हनुमान जन्मोत्सवदिनी करा या मंत्राचे पठण
हनुमान जयंती दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. वैदीक पंचांगानुसार यावर्षी हनुमान जयंती २ एप्रिल २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे.
या दिवशी भक्त हनुमानाची पूजा करतात. तसेच हनुमान चालीसा आणि काही मंत्राचे पठणही केले जाते. त्यामुळे कुटुंबावर हनुमानाची कृपा कायम राहते.
'ओम नमो भगवते हनुमान नम:'
हनुमान जन्मोत्सवदिनी या मंत्रांचे १०८ वेळा पठण केल्यास मानसिक शांती मिळते. तसेच सुख समृद्धीही प्राप्ती होते.
'महाबलय विराया चिरंजीवीं उदते । हरिण वज्र देहया चोलंगघितमहाव्यये'
यां मंत्रपठणामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात. एका जागी शांत बसून या मंत्राचे पठण करावे. त्यानंतर मनातील इच्छा हनुमानापुढे व्यक्त कराव्यात.
'ओम नमो हनुमान रुद्रावताराय सर्वशत्रुसंहाराय सर्वरोग हराय सर्ववशिकरणाय रामदूताय स्वाहा'
जर एखाद्या व्याधीने तुम्ही त्रस्त असाल तर हा मंत्र तुम्हाला नक्कीच आराम देईल. हा कष्ट निवारण मंत्र असून या मंत्रपठणाने मन शांत होते. सकारात्मक विचार मनात येतात. अडचणी टळतात.
Comments are closed.