खरातचे धागेदोरे बड्या नेत्यांपर्यंत; त्याला संपवायचं, तर व्ही.के. सिंहला वाचवायचं अशी चर्चा! रोहित पवारांची खळबळजनक पोस्ट
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे रोज वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत. खरात फाईल्सचे धागेदोरे राज्यातील अनेक बड्या नेत्यांपर्यंत पोहोचल्याचेही समोर आले आहे. त्याच्या चौकशीतून आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी चर्चा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी या संदर्भात मंगळवारी सकाळी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.
खूप काही जणांची खूप काही माहिती असलेल्या भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत येऊन पोहचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं तर दुसरीकडं अजितदादांच्या अपघाताची इत्तंभूत माहिती असलेल्या व्ही. के. सिंहला काहीही झालं तरी वाचवायचं अशा चर्चा आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले.
दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, पण सत्य दडपण्यासाठी कोणाचा जीव घेतला जात असेल किंवा सत्य दडपण्यासाठी कोणाला दोषातून वाचवलं जात असेल तर या दोन्ही बाबी योग्य नाहीत. अशी राजकीय रणनीती कुणी आखत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला हे अजिबात आवडणार तर नाहीच उलट लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल. सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का? अशाने सत्य लपणार आहे का? असा सवालही रोहित पवार यांनी केला.
कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपवता येत नाही, ते कधीतरी बाहेर येतंच’ याचा अनेकांना विसर पडलेला दिसतोय, असा टोलाही रोहित पवार यांनी हाणला. यासोबत रोहित पार यांनी #सत्य_बाहेर_यायलाच_पाहिजे #JusticeForTruth #सत्य_लपणार_नाही असे हॅशटॅगही वापरले आहेत.
खूप काही जणांची खूप काही माहिती असलेल्या भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत येऊन पोहचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं तर दुसरीकडं अजितदादांच्या अपघाताची इत्तंभूत माहिती असलेल्या व्ही के सिंगला काहीही झालं तरी वाचवायचं अशा चर्चा आहेत.
दोषींना…
– रोहित पवार (@RRPSpeaks) ३१ मार्च २०२६
Comments are closed.