‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा, ‘केजीएफ चॅप्टर 2’ला मागे टाकत लवकरच 1400 कोटींची कमाई होईल पार – Tezzbuzz

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 18 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18  मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आदित्य धर दिग्दर्शक हा चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना आवडला आहे तरी यावर त्यांनी प्रतिक्रिया ही दिले आहेत. तसेच हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे.

रणवीर (ranveer) सिंगचा ‘धुरंधर 2’ चित्रपटाने थिएटरमधील दुसऱ्या आठवड्यात प्रचंड कमाई केली आहे. आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय थ्रिलरने आपली गती कायम ठेवली आहे.  आणि आता हा चित्रपट जगभरात 1400 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहे. 12 व्या दिवशी, ‘धुरंधर 2’ ने भारतात अंदाजे 25.30 कोटींची कमाई केली.

‘धुरंधर 2’ या चित्रपटाने आतापर्यंत उत्तम कमाई करत अनेक मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. जे चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केले आहेत आणि प्रेक्षकांच्या मनात भर घर निर्माण केले आहेत अशा चित्रपटांना या चित्रपटाने अगदी कमी कालावधीत कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. ‘धुरंधर 2’ ने आता यशच्या ‘केजीएफ: चॅप्टर 2’ ची भारतातील एकूण आयुष्यभराची कमाई मागे टाकली आहे. ‘केजीएफ: चॅप्टर 2 ने 879.70 कोटी कमावले होते. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ हा चित्रपट आता देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

कमर्शियल LPG सिलेंडरच्या टंचाईमुळे या प्रसिद्ध यूट्यूबरने बंद केले रेस्टॉरंट

Comments are closed.