अमेरिकेचा इराणवर सर्वात भीषण हल्ला; इस्फहान शहरावर टाकला 2000 पाउंडचा बंकर-बस्टर बॉम्ब, ट्रम्प यांनी शेअर केला व्हिडीओ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्य पूर्वेत सुरू असलेले युद्ध धोकादायक वळणावर पोहोचले असून युद्धाची आग अधिकच भडकू लागली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणला उद्ध्वस्त करून टाकू अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती आणि त्यानंतर काही तासातच अमेरिकेने इराणवर भीषण हल्ला चढवला. अणेरिकेने इराणच्या इस्फहान या महत्त्वाच्या शहरात असलेल्या एका मोठ्या दारूगोळा कोठारावर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यासाठी अमेरिकेने अतिशय विनाशकारी मानल्या जाणाऱ्या 2000 पाउंडच्या (जवळपास 910 किलो) बंकर-बस्टर बॉम्बचा वापर केला. या हल्ल्याचा व्हिडीओ डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रूथ’ या सोशल मिडिया माध्यमावर शेअर केला आहे.

अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्यांनी इस्फहान शहरावरील हवाई हल्ल्याला दुजोरा दिला आहे. इस्फहानमधील हे शस्त्र कोठार जमिनीच्या खाली अतिशय मजबूत काँक्रीटच्या थरांमध्ये सुरक्षित करण्यात आले होते. मात्र अमेरिकेने खास अशा भूमिगत तळांना भेदण्यासाठी डिझाइन केलेले पेनेट्रेटर मुनिशन्स तैनात केले. यामुळे इराणच्या लष्करी क्षमतेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे.

Iran US Israel War – इराणहून हिंदुस्थानकडे येणाऱ्या विमानावर अमेरिकेचा हल्ला, 1 एप्रिलला दिल्लीत होणार होतं दाखल

दरम्यान, या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रात्रीच्या अंधारात इस्फहान शहरात एकामागोमाग एक झालेल्या धमाक्यांनंतर आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात उंच उठताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून अमेरिकेने इराणला दिलेला हा मोठा इशारा मानला जात आहे.

Comments are closed.