भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ! आता वन विभागही करणार कारवाई; अघोरी पूजेसाठी प्राण्यांच्या शिकार

अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एसआयटी (SIT) कडून सुरू असलेल्या चौकशीत आता वन विभागानेही (Forest Department) उडी घेतली आहे. अशोक खरातने अघोरी पूजेसाठी वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांचा वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे संकेत वन विभागाने दिले आहेत.

Ashok Kharat Nashik Crime News: वन विभागाचे पोलीस आयुक्तांना लेखी पत्र

अशोक खरात प्रकरणात सुरू असलेल्या तपासाच्या पार्श्वभूमीवर, नाशिकच्या उपवन संरक्षकांनी नाशिक पोलीस आयुक्तांना एक लेखी पत्र धाडले आहे. या पत्रात महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. एसआयटी चौकशीत जर वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याचे काही निष्पन्न झाले, तर त्याप्रकरणी स्वतंत्र तपास आणि कारवाई करण्याचे अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वन्यजीव गुन्हे कारवाई करणे आवश्यक असल्यास वनविभागामार्फत आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे देखील पत्रात म्हटले आहे. दरम्यान, खरातने आपल्या अघोरी विधी आणि पूजेसाठी काही प्रतिबंधित वन्यप्राण्यांची शिकार केली असावी किंवा त्यांच्या अवयवांचा वापर केला असावा, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातची सलग 13 व्या दिवशी SIT चौकशी

दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटीकडून सलग 13 व्या दिवशी चौकशी सुरू आहे. खरातची पोलीस कोठडी उद्या (दि. 01) संपणार असल्याने त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याआधी शक्य तितके ठोस पुरावे गोळा करण्यावर एसआयटीचा भर आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करून तपास सुरू असून, कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी केली जात आहे. या मोबाईल डेटाच्या आधारे नवीन धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, खरातच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचीही येत्या काळात चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Rupali Chakankar : दर पंधरा दिवसाला नाशिकला जात होत्या, तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का? सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांना खोचक सवाल, नामकर्ण आवरेंवरही गंभीर आरोप

Ashok Kharat: ‘स्पॉट व्हिजिट’साठी 5 लाख घ्यायचा, अमावस्या-पौर्णिमेला भक्तांच्या भल्यामोठ्या रांगा, भोंदूबाबाला अलिशान गाड्यांचाही शौक; अशोक खरातच्या ‘व्हीआयपी’ दरबाराचा पर्दाफाश

आणखी वाचा

Comments are closed.