भोंदू खरातच्या भावाचा ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात समावेश? आता दिलीप खरात मैदानात; केसरकरांशी संबंध

Ashok Kharat Brother Dilip Kharat : भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) आणि दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यातील जवळीक अनेकदा माध्यमातून समोर आली. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या संबंधांवरून आरोप देखील केले. आता याच अनुषंगाने भोंदू बाबा अशोक खरात याचे सावत्र भाऊ दिलीप खरात (Dilip Kharat) यांच्यावर देखील आरोप झालाय.

शालार्थ आयडी मिळवताना झालेल्या घोटाळ्यात अशोक खरात यांचा सहभाग असून त्यांच्या भावाने दीपक केसरकर आणि अशोक खरातच्या मदतीने शालार्थ आयडी बनवून घेतल्याचा आरोप करण्यात आला. या सर्व प्रश्नांवर स्वतः दिलीप खरात यांनी पुढे येत स्पष्टीकरण दिले. “माझ्या भावाला मी कुठल्या शाळेत आहे, हेच माहित नाही. तर मला मदत मिळेलच कशी? केवळ कुटुंबातील सदस्य असल्याने खोटे आरोप करत असल्याचं दिलीप खरात यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

Dilip Kharat: भावाच्या माध्यमातून कोणतीच मदत मी घेतली नाही

दिलीप खरात म्हणाले की, या आरोपांमध्ये कुठल्याही तथ्य नाही. माझा शालार्थ आयडी बोगस नाही. 2009 सालापासून मी या संस्थेत काम करतो. सुरुवातीला अनेक वर्ष विनावेतन मी काम केलं. राज्यात विनाअनुदानित संस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर आम्हाला 20 टक्के ग्रँड 2020 मध्ये मिळाली. 2023 मध्ये 20 आणि 2025 मध्ये 20 असे मिळून 60 टक्के ग्रँड सध्या मिळत आहे. भावाच्या माध्यमातून कोणतीच मदत आत्तापर्यंत मी घेतली नाही. तुम्हाला वाटत असेल तर चौकशी करू शकतात. माझ्याकडे माझे सगळे रेकॉर्ड्स उपलब्ध आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Dilip Kharat: केसरकरांशी कुठलाही संबंध नाही

माझ्यावर कोण आरोप करत? हे मी सांगू शकत नाही. आरोप करणारे करतीलच. मी त्याच कुटुंबातील असल्याने आरोप होत असतील. मात्र, भावाचा किंवा केसरकरांचा कुठलाही संबंध माझ्याशी आलेला नाही. त्यांना माहित देखील नाही मी कुठल्या शाळेत आहे. अशोक खरात आणि माझ्या वयात दहा वर्षाचा फरक आहे. मी दहा वर्षांनी लहान आहे. कधीतरी शिवरात्रीला ईशान्येश्वर मंदिरात दर्शनासाठी मी गेलोय. त्या व्यतिरिक्त संबंध आलेला नाही. भाऊ म्हणून आरोप होणं हे वाईट वाटतं. हे सगळं प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे. आम्हाला देखील सगळ्या गोष्टी माहित नाही. बातम्या मधूनच आम्हाला अनेक गोष्टी समजतात, असे देखील दिलीप खरात म्हणाले.

आणखी वाचा

Ashok Kharat Nashik Crime News: भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ! आता वन विभागही करणार कारवाई; अघोरी पूजेसाठी प्राण्यांच्या शिकारीचा संशय

आणखी वाचा

Comments are closed.