‘धुरंधर -2’ यू ट्यूबवर लीक, चाहत्यांनी केली कठोर कारवाईची मागणी
रणवीर सिंहचा ‘धुरंधर २’ थिएटरमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे. परंतु हा चित्रपट नुकताच यू ट्यूबवर लीक झाल्याने, चाहत्यांना धक्का बसला आहे. याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होणार आहे. चित्रपटाची एक पायरटेड आवृत्ती यूट्यूबवर प्रदर्शित झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३,१४९ मिनिटांच्या या चित्रपटाची मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेली आवृत्ती यूट्यूबवर उपलब्ध आहे. काही चाहत्यांनी याबद्दल आदित्य धरला माहिती दिली आणि तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युझरने लिहिले, “आदित्य धर, यामी गौतम, ‘धुरंधर २’ यूट्यूबवर अपलोड झाला आहे. कृपया यूट्यूबकडे तक्रार दाखल करा. मला हा चित्रपट ३००० कोटी रुपयांची कमाई करताना पाहायचा आहे. मला चित्रपटाची कथा आणि सिनेमॅटोग्राफी खूप आवडली. शेवटच्या दृश्यावेळी मी खूप रडले.” या चाहत्याने यूट्यूब चॅनलचे नाव उघड केले नाही.
एका व्यक्तीने आदित्य धर आणि यामी गौतम यांना टॅग करून लिहिले, “तुमचा संपूर्ण चित्रपट यूट्यूबवर अपलोड झाला आहे. कृपया कारवाई करा. यावर आदित्य धर यांच्या टीमकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही.
‘धुरंधर २: द रिव्हेंज’ आता भारतीय चित्रपटसृष्टीतील पाच ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेला आहे. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ३० मार्चला दुसऱ्या सोमवारी ‘धुरंधर: द रिव्हेंज’ने १७,६१४ शोजमधून २५.३० कोटींची कमाई केली आहे. रविवारच्या ६८.१० कोटी रुपयांच्या कमाईच्या तुलनेत चित्रपटाच्या कमाईत ६२.८% घट झाली आहे. ‘धुरंधर २’ची भारतातील एकूण कमाई आता ८७२.१७ कोटी रुपये झाली असून, त्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन १,०४२.२३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.धु
Comments are closed.