आयपीएलदरम्यान खळबळजनक मृत्यू, हॉटेलमध्ये बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट इंजीनियरसोबत नक्की काय घडले?

एकिकडे चाहत्यांमध्ये आयपीएल २०२६ उत्सुकता कायम असताना एक वाईट बातमी समोर येत आहे. आयपीएलच्या सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक ब्रॉडकास्ट इंजीनियर नेमला होता. त्या ब्रिटिश नागरिकाचा मृतदेह मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये आढळला आहे. मृताची ओळख इयान विल्यम्स लॅंगफोर्ड अशी पटली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लॅंगफोर्ड हे २४ मार्चपासून हॉटेलमध्ये थांबले होते. २९ मार्चनंतर वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यानंतर लॅंगफोर्ड आपल्या खोलीत परतले. दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या रिसेप्शनने त्यांना फोन केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हॉटेलचे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. यामुळे त्यांनी मास्टर कीच्या मदतीने दरवाजा उघडला तेव्हा लॅंगफोर्ड हे जमिनीवर पडलेले आढळलेले दिसले.

हॉटेलच्या अधिकाऱ्यांनी लगेचच डॉक्टरांना बोलावले आणि त्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राइव्हचे पोलिस तेथे पोहोचले. गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. तसेच त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही. शवविच्छेदन झाल्यानंतर अधिक माहिती समोर येईल.

मुंबई-कोलकाता सामना: या सामन्यात

Comments are closed.