टीम इंडियातून बाहेर, पण IPL मध्ये दोन्ही दिग्गज कर्णधार… आज शुभमन गिल-श्रेयस अय्यर आमने-सामने
Punjab Kings vs Gujarat Titans Live Update IPL 2026 In Marathi : आयपीएल 2026 मध्ये यंदा प्रचंड धावांचा पाऊस पडताना दिसत आहे. प्रत्येक सामन्यात मोठमोठे स्कोअर होत असल्याने चाहत्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. आज, मंगळवारी पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणारा सामना देखील हाय-स्कोअरिंग ठरण्याची शक्यता आहे.
न्यू चंदीगडमधील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे हा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांचा हा आयपीएल 2026 मधील पहिलाच सामना असल्याने विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्स मैदानात उतरणार आहे, तर गुजरात टायटन्सची धुरा शुभमन गिल सांभाळणार आहे. दोन्ही युवा कर्णधारांसाठी हा सामना प्रतिष्ठेचा मानला जात आहे.
हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होणार असून 7 वाजता नाणेफेक होईल. गेल्या हंगामात पंजाब किंग्सने अंतिम फेरी गाठली होती, मात्र त्यांना विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे यंदा अय्यरच्या नेतृत्वाखाली संघ पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
दुसरीकडे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सही विजयी सुरुवात करून स्पर्धेत दमदार छाप पाडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आजचा सामना रंगतदार आणि धावांचा पाऊस पाडणारा ठरण्याची दाट शक्यता आहे.
Comments are closed.