Hair Removal: 10 मिनिटांत घरच्या घरी बनवा हेअर रिमूव्हल




10 मिनिटांत घरच्या घरी बनवा हेअर रिमूव्हल


नको असलेले केस हा अनेकांच्या सौंदर्याशी संबंधित मोठा प्रश्न असतो. हात-पायांवरील केस काढण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग करणे किंवा घरी रेझर वापरणे हे सर्वसामान्य पर्याय आहेत. मात्र, वॅक्सिंगची वेदना, रेझरमुळे होणारी त्वचेची काळजी आणि केमिकलयुक्त क्रीम्सचे साइड इफेक्ट्स यामुळे अनेकजण नैसर्गिक पर्याय शोधत असतात.

अशावेळी, स्वयंपाकघरातील साधे घटक वापरून तुम्ही वेदनारहित आणि सुरक्षित पद्धतीने केस काढू शकता. हे उपाय केवळ केस काढत नाहीत, तर त्वचेला मऊ, उजळ आणि निरोगी ठेवण्यासही मदत करतात. (homemade hair removal natural remedies smooth skin)

1. बेसन आणि हळदीची पेस्ट :
कृती: २ चमचे बेसन, अर्धा चमचा हळद, थोडे दूध किंवा पाणी हे सर्व एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा. हाता-पायांवर लावा 10-15 मिनिटांनी सुकल्यावर हलक्या हाताने चोळून काढा. असे केल्यास बारीक केस कमी होतात त्वचा उजळते आणि नैसर्गिक एक्सफोलिएशन होते.

2. मसूर डाळ स्क्रब:
कृती: मसूर डाळ रात्रभर दुधात भिजवा सकाळी जाडसर वाटून घ्या त्यात थोडं मध मिसळा नंतर त्वचेवर लावून गोलाकार मसाज करा वाळल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. या वॅक्समुळे केस कमी होण्यास मदत टॅनिंग कमी होते व त्वचा मऊ आणि स्वच्छ दिसते.

3. साखर आणि लिंबाचा कोल्ड वॅक्स:
कृती: २ चमचे साखर 1 चमचा लिंबाचा रस थोडे पाणी हे मिश्रण गरम करून चिकटसर बनवा. कोमट असतानाच केसांवर लावा कापडी पट्टी ठेवून विरुद्ध दिशेने ओढा. यामुळे केस मुळापासून निघतात वॅक्सिंगसारखा परिणाम मिळतो आणि त्वचा गुळगुळीत राहते.

वापरताना घ्यायची काळजी?
– कोणताही उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करा
– संवेदनशील त्वचेवर हलक्या हाताने वापरा
– जास्त जोराने घासणे टाळा
– नियमित वापर केल्यास चांगला परिणाम मिळतो.



Comments are closed.