बॉल टेम्परिंगच्या विळख्यात अडकला फखर जमान… कॅमेरासमोर नको नको ते कृत्य केलं, आता पाकिस्तानी ब
फखर जमानवर PSL बॉल-टेम्परिंग 2026 वर बंदी पाकिस्तान सुपर लीग 2026 (PSL 2026) मध्ये बॉल टॅम्परिंग (PSL Ball-Tampering) म्हणजेच चेंडूशी छेडछाड केल्याचा मोठा वाद समोर आला आहे. या प्रकरणात पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज फखर जमान (Fakhar Zaman) याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. तो सध्या लाहोर कलंदर संघाकडून खेळत आहे. 29 मार्च रोजी झालेल्या सहाव्या सामन्यात हा वाद पेटला, ज्यात कराची किंग्स आणि लाहोर कलंदर्स आमनेसामने होते.
बॉल टेम्परिंगच्या विळख्यात अडकला फखर जमान (Fakhar Zaman PSL Ball-Tampering 2026)
या घटनेची गंभीर दखल घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने चौकशी केली आणि फखर जमानला ‘लेव्हल-3’ उल्लंघनात दोषी ठरवले. परिणामी, त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सुनावणीदरम्यान फखरने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले होते. मात्र, पंचांच्या अहवालाच्या आधारे पीसीबीने त्याला दोषी ठरवत निलंबन कायम ठेवले.
पाकिस्तानी बोर्डावर बंदी (फखर जमान PSL बॉल-टेम्परिंग 2026)
या प्रकरणात मैदानावरील पंच शाहिद सैकत, फैसल खान आफरीदी, तसेच टीव्ही अंपायर आसिफ याकूब आणि चौथे पंच तारिक रशीद यांनी त्याच्यावर आरोप नोंदवले होते. या बंदीमुळे फखर जमान आगामी मुलतान सुलतान्स आणि इस्लामाबाद युनायटेड विरुद्धचे दोन महत्त्वाचे सामने खेळू शकणार नाही, ज्यामुळे लाहोर कलंदर्सला मोठा धक्का बसला आहे.
सामन्यात चेंडूशी छेडछाड अन्…. (PSL Ball-Tampering 2026 Update)
सामन्यात पंचांना चेंडूशी छेडछाड झाल्याचा संशय आल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. मैदानावरील पंचांनी लाहोर कलंदर्स संघावर थेट 5 धावांची पेनाल्टी ठोठावली. इतकेच नाही, तर ओव्हर सुरू होण्यापूर्वी संशयित चेंडूही बदलण्यात आला. ही नाट्यमय घटना सामन्याच्या शेवटच्या षटकापूर्वी घडली. त्या वेळी कराची किंग्स संघाला विजयासाठी 6 चेंडूत 14 धावांची गरज होती. याच वेळी फखर जमान याने चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप झाला, मात्र पंचांनी तत्काळ चेंडू बदलून परिस्थिती नियंत्रणात आणली.
शाहीनने आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप दाखवला नाही; त्याऐवजी, तो क्षणात पकडले गेल्याची कबुली देत होता, हसतमुखाने त्याच्या क्षेत्ररक्षणाकडे परत जात होता.
हे पछाडतील @lahoreqalanders येणाऱ्या वर्षांसाठी.pic.twitter.com/JpXoEmQJxW
— पॅव्हेलियन पोस्ट (@CricinsightsX) 29 मार्च 2026
यानंतर शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी हॅरिस रौफ याच्यावर सोपवण्यात आली. पण पेनाल्टीमुळे कराची किंग्सला केवळ 9 धावांची गरज उरली. त्यांनीही ही संधी दवडली नाही, फक्त 3 चेंडूंमध्येच आवश्यक धावा करत सामना जिंकला. या संपूर्ण प्रकारामुळे सामना अधिकच रंगतदार झाला, मात्र लाहोर कलंदर्ससाठी हा निर्णय मोठा धक्का ठरला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.