IPL 2026 – ब्रॉडकास्ट इंजिनिअरच्या मृत्यूवर BCCI ची पहिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 च्या ब्रॉडकास्ट टीममधील अनुभवी ब्रॉडकास्ट इंजिनिअर इयान विलियम लँगफोर्ड यांचे मुंबईत निधन झाले आहे. 76 वर्षीय लँगफोर्ड हे मूळचे ब्रिटिश नागरिक असून ते आयपीएलच्या प्रसारणाशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत होते. 30 मार्चच्या सकाळी दक्षिण मुंबईतील हॉटेलच्या खोलीत ते बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे आयपीएल वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने अधिकृत पत्रक जारी करून लँगफोर्ड यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “इयान लँगफोर्ड हे आमच्या ब्रॉडकास्ट टीमचे अविभाज्य घटक होते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने आयपीएल गवर्निंग कौन्सिल आणि सर्व भागधारकांना मोठा धक्का बसला आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या दुःखात सहभागी आहोत,” अशा शब्दांत बोर्डाने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, या कठीण काळात लँगफोर्ड यांच्या कुटुंबाला सर्व आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासनही बीसीसीआयने दिले आहे.

67 विकेट घेऊनही दुर्लक्षित, निवड समितीला संदेश देत निवृत्तीवर शमी थेट बोलला

मरीन ड्राइव्ह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लँगफोर्ड 24 मार्चपासून हॉटेल ट्रायडेंटमध्ये वास्तव्यास होते. 29 मार्च रोजी रात्री आयपीएल सामन्याचे काम संपवून ते हॉटेलवर परतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते बराच वेळ खोलीबाहेर न आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता ते बेशुद्धावस्थेत सापडले. पडद्यामागे राहून आयपीएल यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे बीसीसीआयने यावेळी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.