आयपीएल 2026 नंतर 'या' संघासोबतही टी-20 मालिका खेळणार टीम इंडिया; वर्ल्ड कपच्या तयारीसाठी महत्त्वाचा दौरा!
आयपीएल (IPL 2026) संपल्यानंतर भारतीय संघाला अजिबात विश्रांती मिळणार नाही. कारण, टीम इंडिया (Team india) एकापाठोपाठ एक मालिका खेळताना दिसणार आहे. बीसीसीआय (BCCI) आतापासूनच 2027 च्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपच्या तयारीला लागली आहे. यामुळेच जुलैमध्ये टीम इंडिया आणखी एक मोठी मालिका खेळू शकते. रिपोर्टनुसार, ही मालिका इंग्लंड दौऱ्यानंतर खेळवली जाऊ शकते.
‘क्रिकेट फायनान्शिअल जर्नल’च्या रिपोर्टनुसार, भारतीय संघ जुलै 2026 च्या शेवटी जिम्बाब्वेविरुद्ध ३ सामन्यांची टी-20 मालिका खेळू शकतो. जरी बीसीसीआयने अजून यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले नसले, तरी 2027 च्या वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण, आगामी वर्ल्ड कप जिम्बाब्वे, नामीबिया आणि दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी भारतीय खेळाडूंना हा दौरा फायदेशीर ठरेल. गेल्या 4 वर्षांतील हा भारताचा तिसरा जिम्बाब्वे दौरा असू शकतो. या दौऱ्यावर निवडकर्ते युवा खेळाडूंना, विशेषतः जे टी-20 आणि वनडे दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळतात, त्यांना संधी देऊ शकतात.
टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध आयपीएल 2026 संपल्यानंतर मायदेशात 1 कसोटी आणि 3 वनडे सामने खेळेल. त्यानंतर आयर्लंड विरुद्ध त्यानंतर 2 टी-20 सामन्यांची मालिका होईल. तसेच इंग्लंड विरुद्ध (जून-जुलै) 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाईल. त्यानंतर जिम्बाब्वे विरुद्ध 2027 च्या जानेवारीत जिम्बाब्वेचा संघ 3 वनडे सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे, ज्याचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले आहे.
Comments are closed.