IPL 2026 – अखेरच्या षटकात नियंत्रण सुटलं,अर्शदीप सिंगच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 च्या चौथ्या सामन्यात पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप याच्या नावावर एक असा विक्रम नोंदवला गेला, जो कोणत्याही गोलंदाजाला नकोसा वाटेल. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात त्याने तब्बल 11 चेंडू टाकले. मुल्लांपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दबावाखाली अर्शदीपने 4 वाईड आणि 1 नो-बॉल टाकल्यामुळे त्याचे षटक लांबले.

IPL 2026 – चिन्नास्वामी स्टेडियमवर चोरट्यांचा सुळसुळाट; मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अल्पवयीन मुलांचा वापर

या कामगिरीमुळे अर्शदीप आता IPL मधील त्या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे, ज्यांनी एका षटकात 11 चेंडू टाकले आहेत. या ‘अनिच्छित क्लब’मध्ये मोहम्मद सिराज, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, संदीप शर्मा आणि हार्दिक पंड्या यांचा आधीच समावेश आहे. विशेष म्हणजे IPL इतिहासात सर्वप्रथम 11 चेंडूंचं षटक टाकण्याचा विक्रम मोहम्मद सिराजच्या नावावर 2023 मध्ये नोंदला गेला होता. अखेरच्या षटकात अर्शदीपने 11 चेंडूंमध्ये 12 धावा दिल्याने गुजरातने 20 षटकांत 6 बाद 162 धावांपर्यंत मजल मारली.

Comments are closed.