Summer Face Mask: उन्हाळ्यात त्वचेची खास काळजी घ्या, घरच्या घरी बनवा फेस मास्क, मिळवा नैसर्गिक ग्लो
उन्हाळा आला की त्वचेच्या समस्या वाढायला लागतात. घाम, उष्णता, टॅन, तेलकटपणा आणि निस्तेजपणा. अशा वेळी महागड्या प्रॉडक्ट्सपेक्षा घरच्या घरी बनवलेले नैसर्गिक फेस मास्क अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात. हे मास्क त्वचेला थंडावा देतात, पोषण करतात आणि नैसर्गिक चमक परत आणतात. यामुळे 3 असे प्रभावी फेस मास्क आहेत जे तुम्ही घर बनवू शक्ता. नियमितपणे हे घरगुती फेस मास्क वापरल्यास तुमची त्वचा उन्हाळ्यातही थंड, ताजीतवानी आणि नैसर्गिकरित्या ग्लोइंग राहील.(take special care of your skin in summer make a face mask at home and get a natural glow keywords)
1. काकडी, कोरफड व्हेरा फेस मास्क
हा फेस मास्क बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे काकडीचा रस आणि 1 चमचा अॅलोवेरा जेल घ्या. हे दोन्ही एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचेला त्वरित थंडावा मिळतो. सनबर्न आणि जळजळ कमी होते आणि त्वचा हायड्रेट आणि फ्रेश राहते. काकडीमध्ये भरपूर पाणी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करतात अॅलोवेरा त्वचेला शांत करतो, आणि मॉइश्चर प्रदान करतो.
2. मध, लिंबू, दही फेस मास्क
हा फेस मास्क बनवण्यासाठी तुम्हाला 1 चमचा मध आणि 1 चमचा दही त्यासोबत काही थेंब लिंबाचा रस एकत्र करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी धुवा. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते. डाग-धब्बे हलके होतात आणि त्वचा मऊ आणि उजळ दिसते. असे याचे फायदे आहेत. हा फेस मास्क त्वचेला नैसर्गिक चमक देण्यासाठी आणि टॅन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. घरच्या घरी सहज बनवता येणारा हा उपाय उन्हाळ्यात खास फायदेशीर ठरतो.
3. बेसन, हळद, गुलाबपाणी फेस मास्क
हा फेस मास्क बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे बेसन 1 चिमूट हळद आणि आवश्यकतेनुसार गुलाबपाणी घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर हलक्या हाताने स्क्रब करत धुवा. यामुळे टॅन कमी होतो, डेड स्किन काढून टाकतो आणि त्वचा स्वच्छ आणि उजळ दिसते. हा पारंपरिक घरगुती फेस मास्क त्वचा स्वच्छ, उजळ आणि टॅनमुक्त ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे. उन्हाळ्यात त्वचेवरील मळ, तेलकटपणा आणि डेड स्किन काढण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
उन्हाळ्यात फेस मास्क वापरणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच योग्य पद्धतीने वापरणंही गरजेचं आहे. चेहरा नेहमी स्वच्छ करूनच मास्क लावा आणि आठवड्यातून 2 वेळा फेस मास्क लावणं पुरेसं आहे. यामुळे घरच्याघरी नैसर्गिक ग्लो मिळेल.
Comments are closed.