भाजपला मदत करणाऱ्या ७ नगरसेवकांचे निलंबन, जालन्यात काँग्रेसची मोठी कारवाई
जालना महानगरपालिकेतील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. स्वीकृत सदस्य निवडीवेळी पक्षशिस्तीचा भंग करून भारतीय जनता पक्षाला मदत केल्याच्या ठपक्यावरून काँग्रेसने आपल्या ७ नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.
महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया पार पडली. यावेळी काँग्रेसच्या ७ नगरसेवकांनी पक्षाच्या ध्येयधोरणांच्या विरोधात जाऊन भाजपच्या उमेदवारांना उघडपणे मदत केली. या प्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचे म्हणत काँग्रेसने ही कारवाई केली आहे.
काँग्रेसने नगरसेवक फरुक सादिक तुंडीवाले, इम्रान खान आमानुल्ला खान, फरहाना अ. रऊफ अंसारी, सुनिल अशोक बोरडे, मयुरी दिनेश देने, रुबिना मजिद पठाण, अनिल अशोक तिरुखे या ७ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाला उघडपणे मदत करून पक्षशिस्तीचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
Comments are closed.