राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत बदल, तटकरे-पटेलांच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार असमाधानी

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेत बदल अजित पवार यांच्या निधनानंतर 16 फेब्रुवारी रोजी प्रफुल्ल पटेल (Praful Patel) , सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या सह्यांचे एक पत्र निवडणूक आयोगाला देऊन पक्षाचे सर्व अधिकार प्रफुल पटेल यांच्याकडे देण्याचा घाट घालण्यात आला होता, असा आरोप करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानातील या बदलाबाबत आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे स्पष्टीकरण दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सुनेत्रा पवार या स्पष्टीकरणावर असमाधानी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात बदल करण्यावरुन पक्षात दोन तट पडल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे आपली बाजू मांडली. पक्षाच्या घटनेत बदल करून अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षकडे अधिकार द्यावेत याबाबतचे पत्र पटेल, तटकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अधिकार द्यावेत अशा आशयाचे पत्र देण्यात आले होते. या पत्रानंतर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सर्व पत्रव्यवहार अमान्य समजून दुर्लक्षित करावेत, असे पत्र निवडणूक आयोगाला दिले होते. या घडामोडीनंतर पक्षात बरेच वादंग झाले. यानंतर तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तटकरे आणि पटेल यांच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार समाधानी नसल्याची माहिती आहे.

NCP: पत्रव्यवहारानंतर पडद्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय घडले?

सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी पत्रव्यवहार केल्यानंतर 10 मार्च रोजी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून तटकरे,पटेलांनी पाठवलेले पत्र ग्राह्य धरू नका म्हणून सांगितले. तटकरे, पटेल यांच्या पत्रानंतर दोन्ही नेत्यांबाबत पक्षात नकारात्मक आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले. अशा स्थितीत आपली भूमिका समजावून सांगितली पाहिजे, अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडली. त्यानंतर सोमवारी वांद्रे येथील एमईटी येथे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्यात बैठक झाली. या बैठकीत घटनेत केलेल्या बदलाबाबत स्पष्टीकरण सुनेत्रा पवार यांना द्यावा असे ठरवण्यात आले. त्यानुसार काल मंगळवारी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, मुंडे आणि मुश्रीफ यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे स्पष्टीकरण सुनेत्रा पवारांना फारसे रुचलेले नाही.

आणखी वाचा

NCP: राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘कणा’च नव्या संविधानातून गायब?, ओबीसी अन् अल्पसंख्याक सेल वगळल्याने खळबळ, 7 ऐवजी आता फक्त 4 फ्रंटल सेल

आणखी वाचा

Comments are closed.