इराणच्या नवीन राष्ट्राध्यक्षांनी केली युद्धविरामाची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील संघर्षाबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेशी संपर्क साधून युद्धविराम (Ceasefire) करण्याची विनंती केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, इराणचे नवीन नेतृत्व त्यांच्या पूर्वीच्या नेत्यांच्या तुलनेत कमी कट्टर आणि अधिक समजूतदार आहे. त्यांनी म्हटले की, “इराणच्या नवीन प्रशासनाकडून युद्धविराम करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.” मात्र ट्रम्प यांनी युद्धविरामासाठी एक अटही घातली आहे.
ट्रम्प यांनी म्हटले की, जोपर्यंत होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पूर्णपणे खुली आणि जहाजांच्या वाहतुकीसाठी सुरक्षित होत नाही, तोपर्यंत अमेरिका युद्धविरामाचा विचार करणार नाही. जर ही अट मान्य झाली नाही, तर इराणला पाषाण युगात (Stone Age) ढकलले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Comments are closed.