‘मनुस्मृती वाचली असती तर…’ माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पों

Sharad Ponkshe and Babasaheb Ambedkar: मनुस्मृतीमध्ये कुणालाही दुय्यम वागणूक दिलेली नाही. ती जाळणाऱ्यांनीही वाचली नाही. वाचली असती तर ते जाळू शकले नसते, या वक्तव्यावरुन वादंग निर्माण झाल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी माफी मागितली आहे. ‘मूळ मनुस्मृती (Manusmriti) वाचली असती तर ती जाळली नसती’, या शब्दामुळे जर माझे बंधू -बांधव दुखावले गेले असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी सांगितले. (Sharad Ponkshe News)

शरद पोंक्षे यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन आपली भूमिका मांडली. सध्या माझं एक वक्तव्य मीडिया फिरवतंय. अशी नेहमीच माझी वक्तव्य तोडून-मोडून फोडून मीडियावाले फिरवत असतात. संपूर्ण भाषण कोणी कधी दाखवत नाही. माझ्या भाषणातलं मागचं पुढचं सगळं कापून त्यामुळे समाजात वाद कसा निर्माण होईल, याबद्दल काळजी घेऊन नेहमी माझी वक्तव्यं टाकत असतात. माझी दोन वक्तव्यं त्यांनी चालवलेली. एक मी आरएसएसबद्दल बोललेलो आणि दुसरं मनुस्मृतीजर वाचली असती, तर ती जाळली नसती, असं मी बोललो. आता हे बोलण्याचा माझा उद्देश असा आहे की, हिंदुत्व या विषयावर बोलत असताना, हिंदू धर्मातील जे सगळे धर्मग्रंथ आहेत, भगवद्गीता आहे, रामायण आहे, तर हे सगळं आपण वाचतच नाहीये. हे जर वाचलं तर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय. हा माझा मूळ उद्देश आहे. त्यामुळे मी असं म्हटलं. सगळे वेद, उपनिषदं संपूर्ण भाषण युट्युबवर उपलब्ध आहेत, तुम्ही ते बघू शकता. मनुस्मृती मूळ जर वाचली, त्याची अनेक रूपं झाली. आता बाबासाहेबांनी मनुस्मृती जरी जाळली तरी त्यांनी हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर केलेला आहे, हे त्यांनी स्वतः म्हटलंय, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले.

Sharad Ponkshe: मला व्याख्यान्यासाठी बहुजन लोकांकडूनच जास्त बोलावणे येते: शरद पोंक्षे

मी सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचा अभ्यास करत आहे. खरे बाबासाहेब लोकांपर्यंत पोहोचावेत, कळावेत, ते कसे होते, ते सांगण्यासाठी माझी धडपड सुरु आहे. काही दिवसांनी ते तुम्हाला दिसेल.  ‘मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती’, या शब्दामुळे जर माझे बंधू -बांधव दुखावले गेले असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. माझा मूळ हेतू आणि मूळ उद्दिष्ट हे आहे की, हिंदू धर्मातील सर्व जाती, पंथ यांच्या भिंती संपून आपण एक हिंदू म्हणून, एक भारतीय म्हणून वज्रमूठ म्हणून एकत्र राहायला पाहिजे हा माझा मूळ हेतू आहे. माझी सगळी व्याख्यानं तुम्ही ऐकू शकता, मी कधी काही लपवत नाही. माझी जास्त व्याख्यानं बहुजन समाजातीलच लोक ठेवतात. काही लोक बावळटासारख्या प्रतिक्रिया देत असतात. पण माझ्या काही चांगल्या मित्रांनी प्रतिक्रिया दिल्यामुळे मला असं वाटलं की, एक व्हिडीओ करावा आणि दिलगिरी व्यक्त करावी. मुळात मी बाबासाहेबांचा, सगळ्या महापुरुषांचा अत्यंत आदर करणारा माणूस आहे. बोलण्याच्या ओघात कधीतरी शब्द निघून जातो. त्यामुळे मनुस्मृतीबाबतच्या वाक्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर मी मनापासून माफी मागतो.

आणखी वाचा

आम्हाला कुणीच हरवू शकत नाही, आम्हीच सर्वस्वी, या अहंकारात भाजपनं राहू नये; शरद पोंक्षेंचा नागपुरात जाऊन इशारा!

आणखी वाचा

Comments are closed.