पुण्यातील बिल्डर चोरडिया बंधूंचा प्रताप, बंगल्यासमोरील गरिबांच्या हातगाड्या नकोशा, कोरेगाव पार्
गुन्ह्याच्या बातम्या ठेवा: पुण्यातील कोरेगाव पार्क भागात एक चमत्कार घडला आहे. रस्त्याच्या कडेला रातोरात एक गार्डन तयार झालं असून त्या गार्डनमध्ये (Garden) रात्रीत मोठी झाडं आणि हिरवगार गवत देखील उगवून आले आहे. या चमत्काराची महापालिकेच्या (Pune Mahangarpalika) अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून हे असं रातोरात गार्डन कसं तयार झालं याची माहिती घेतली जात आहे. (Pune Lates News)
कोरेगाव पार्क मधील लेन नंबर तीनमध्ये अनेक बड्या उद्योगपतींचे बंगले आहेत. ज्यामध्ये बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया आणि त्यांचे बंधू सागर चोरडिया यांच्या बंगल्याचाही समावेश आहे. गेल्या महिन्यात सागर चोरडिया यांच्या मुलीचे लग्न होते. अनेक व्हीआयपी त्यासाठी चोरडिया यांच्या बंगल्यात येणार होते. मात्र, कोरेगाव पार्कच्या या रस्त्यावर कष्टकऱ्यांची भुक भागवणारे चार हातगाड्या होत्या. अगदी कमी किंमतीत या ठिकाणी खाद्यपदार्थ विकले जात होते. या हातगाडी चालकांकडे महापालिकेचे लायसन्स होते आणि महापालिकेने तो भाग हॉकर झोन म्हणून जाहीर केल्याची पाटी देखील या ठिकाणी आहे. मात्र, चोरडिया यांच्या आलिशान घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर या हातगाड्या डोळ्यांना खुपत असल्याने त्या हटवण्यात आल्या. त्या पुन्हा आपल्या जागी येऊ नयेत, यासाठी चोरडिया यांच्याकडून रातोरात रस्त्याच्या कडेला हे गार्डन उभारण्यात आले.
याबाबत आम्ही चोरडिया यांची बाजू जाणून घेण्यासाठी दोन दिवस प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. सागर चोरडिया आणि अतुल चोरडिया यांच्याशी आम्ही फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र, फोन उचलला गेला नाही. चोरडिया यांच्या पंचशील ग्रुपच्या माध्यम समन्वयक सुरभी गुप्ता यांच्याशी फोनवरून संपर्क करून त्यांना आम्ही या विषयाची माहिती दिली, त्याचबरोबर हा विषय लेखी स्वरूपात सविस्तर त्यांना पाठविण्यात आला. मात्र त्यांच्याकडून त्यानंतर प्रतिसाद मिळाला नाही.
याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला. मात्र क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी हे गार्डन हटविण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागाची असल्याच सांगितले. अतिक्रमण विभागाने ही जबाबदारी गार्डन विभागाची असल्याचे सांगितलं तर गार्डन विभागाने हे गार्डन आम्ही उभारलेले नाही. त्यामुळे ते हटवण्याची जबाबदारी आमची नसल्याचे म्हटले. मात्र, यापैकी एकही अधिकारी एबीपी माझाच्या प्रतिनिधींना कार्यालयात भेटला नाही.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.