लखनऊच्या नवाबांची घरच्याच मैदानात शिकार! दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी, Points Table मध्ये उघडल
DC ने LSG ला 6 विकेट्स ने हरवले IPL 2026 : आयपीएल 2026 मधील पाचवा सामना एकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स Lucknow Super Giants) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळला गेला. नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय अचूक ठरला. दिल्लीच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत लखनौ सुपर जायंट्सला अवघ्या 18.4 षटकांत 141 धावांवर रोखले. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना समीर रिझवी याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने हा सामना 6 विकेट्सने जिंकत लखनऊवर दणदणीत विजय मिळवला.
घट्ट पकड. प्रभाव. सॅम. 🤝💪 pic.twitter.com/mCkNgeuhYm
— दिल्ली कॅपिटल्स (@DelhiCapitals) १ एप्रिल २०२६
कर्णधार ऋषभ पंत नापास
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्ससाठी कर्णधार ऋषभ पंत आणि मिचेल मार्श यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनीही संथ सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने अवघ्या 48 धावांत दोन गडी गमावले. कर्णधार ऋषभ पंत 9 चेंडूंत 7 धावा करून धावबाद झाला. त्यानंतर अॅडम मार्करम 8 चेंडूंत 11 धावा करून अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला.
निम्मा संघ 71 धावांवर तंबूत
त्यानंतर लखनऊने 49 धावांवर आयुष बडोनीच्या रूपाने आपली तिसरी विकेट गमावली. आयुष बडोनीने तीन चेंडूंचा सामना केला पण त्याला खाते उघडता आले नाही. तो नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर, निकोलस पूरन लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. पूरन आठ चेंडूंमध्ये 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादवने मिचेल मार्शला बाद करून एलएसजीला पाचवा धक्का दिला. मार्शने 28 चेंडूंमध्ये 35 धावा केल्या. अशाप्रकारे, लखनऊ सुपर जायंट्सचा निम्मा संघ 71 धावांवर तंबूत परतला.
अब्दुल समद एकटा नडला अन्….
त्यानंतर अब्दुल समद एक चांगली खेळी खेळून बाद झाला. अब्दुल समदने कठीण परिस्थितीत एलएसजीसाठी महत्त्वपूर्ण खेळी करत 25 चेंडूंमध्ये 36 धावा केल्या. तो नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर लखनऊचे नियमित अंतराने गडी बाद होत गेले आणि त्यांचा संघ 18.4 षटकांत 141 धावांवर गारद झाला.
केएल राहुल शून्यावर OUT…
लखनऊ सुपर जायंट्सने दिलेल्या 142 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात केएल राहुल आणि पथुम निस्संका यांनी केली. मात्र, मोहम्मद शमीने डावाच्या पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला बाद केले. राहुलला एकही धाव काढता आली नाही. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का बसला, जेव्हा नितीश राणा मोहसिन खानच्या गोलंदाजीवर 15 धावांवर बाद झाला. राणाने 17 चेंडूंमध्ये 15 धावा केल्या.
समीर रिझवीने ठोकले अर्धशतक…
त्यानंतर प्रिन्स यादवने पाचव्या षटकात दिल्ली कॅपिटल्सला दोन धक्के दिले. प्रथम, त्याने पथुम निस्संकाला एका धावेवर बाद केले. त्यानंतर, त्याने कर्णधार अक्षर पटेलला शून्यावर बाद केले. शेवटी समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी पाचव्या विकेटसाठी एक उत्कृष्ट भागीदारी केली. कठीण परिस्थितीत, समीर रिझवीने दिल्ली कॅपिटल्ससाठी एक शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 37 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.
आणखी वाचा
Comments are closed.