पुणे बाजार समितीत सेस घोटाळा! यंदा उत्पन्नात मोठी घट होणार, संचालकाच्या गाळ्यावर काम करणाऱ्याच्या हातात ठेक्याचा कारभार
पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाने संगणकीय पद्धतीने शेतमालाची आवक नोंद करण्याच्या कामाचा ठेका सर्व नियम धाब्यावर बसवून दिला असतानाच आता हा ठेका चालवण्याची जबाबदारी एका संचालकाच्या गाळ्यावर अकाउंटचे (दिवाणजीचे) काम पाहणार्याच्या हाती सोपवली आहे. गेली आठ महिने बाजारातील आडत्यांना शेतमाल आवकचे मेसेज बंद झाले आहेत. तर समितीला गेल्या आठ महिन्यात एकही अहवाल दिला नाही. शेतमाल आवक, सेस याची चोख माहिती असणा्रयाच्या हाती कारभार दिल्याने शेतमालाची आवक, बाजारभाव कमी दाखवून सेस कमी करण्याच्या उद्योगाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे यंदा बाजार समितीचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील फळे, भाजीपाला, कांदा बटाटा, केळी, गूळ भुसार बाजारात दाखल होणार्या विविध प्रकारच्या शेतमालाचीआवकनोंदकेली जाते. त्यानुसार होणार्या विक्रीवर बाजार फी (सेस) आकारणी केली जाते. बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यानंतर पहिल्याच वर्षी बाजार समिती सेसच्या (बाजार फी) उत्पन्नात १६ कोटींनी वाढ झाल्याचा डंका वाजवला होता. शेतमालाची आवक नोंद करण्यासाठी बाजार समितीने संगणक प्रणाली बसविली आहे. स्टा\लग सिस्टम प्रा.लि ही आवक नोंदचे काम पाहत होते. त्यांच्याआवकनोंद प्रक्रियेमुळेसेस चुकवेगिरीला चाप बसल्याचे गेल्यावर्षी प्रशासनाने सांगितले होते. मात्र, गेल्या आठ महिन्यापूर्वी या कामाचा ठेका कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता थेट स्पिडल वर्ल्ड यांना देऊन टाकला. मात्र, या ठेक्याचे सर्व काम एका संचालकाच्या गाळ्यावर काम करणा्रयाच्या हाती सोपवले आहे. यापूर्वी बाजारात गेटवर आवक नोंद झाल्यानंतर संबंधित आडत्याला आपल्या गाळ्यावर काय आणि किती शेतमाल आवक झाली याचा मेसेज जात होता. स्पिडल वर्ल्ड यांच्याकडे काम आल्यापासून हे मेसेज बंद झाले. कोणाकडे काय आणि किती प्रमाणात आवक होते याचा कोणाला थांगपत्ता लागत नाही. ज्या माणसाला सर्व खाचाखुणा माहिती आहे. त्याच्या हातात ही जबाबदारी असल्याने सेसमध्ये झोलची चर्चा नाकारता येत नाही. त्यामुळे सेसचोरीला प्रशासनाकडून खतपाणी घातले जात असल्याचे बोलले जात आहे.
ठेकेदाराचा विभाग प्रमुखांनाही कोलदांडा
स्पिडल वर्ल्ड ठेकेदाराकडून ठेका सुरू केल्यापासून म्हणजे जून २०२५ पासून एकही अहवाल बाजार समितीच्या विभाग प्रमुखांना दिला नसल्याचे समोर आले आहे. याबाबत फळे, भाजीपाला, कांदा बटाटा विभागाचे प्रमुख बाळासाहेब कोंडे, केळी विभागाचे प्रमुख आशिष राऊत आणि गूळ भुसार विभागाचे प्रमुख प्रशांत गोते यांना आवक नोंदीचे रिपोर्ट मागितले असता ठेकेदाराकडून घेतो असे सांगितले. आठ दिवस पाठपुरावा करून देखील हे रिपोर्ट ठेकेदाराने दिले नसल्याचे तिन्ही विभाग प्रमुखांनी सांगितले. त्यामुळे तीनही विभाग प्रमुख नक्की काय काम करतात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बाजारात शेतमालाची आवक झाल्यानंतर कोणाच्या गाळ्यावर किती आवक झाली याची माहिती मेसेज द्वारे मिळत होती. आवकमधे तफावत झाल्यानंतर आडत्यांकडून ही गोष्ट निदर्शनास आणून दिली जात होती. त्यानंतर सुधारणा केली जायची. आता मेसेज बंद झाल्यांमुळे आवक आणि सेस याचा ताळमेळ लागत नाही. सेस पोटी जास्त पैशांची मागणी केल्यामुळे अधिकारी आणि आडते यांच्यात मतभेद होतात. त्यामुळे मेसेज सुविधा पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे. – सौरभ कुंजीर, उपाध्यक्ष, आडते असोसिएशन, मार्केटयार्ड.
ई निविदेद्वारे हा ठेका देण्याची प्रक्रिया सुरू आहे. नव्याने येणार्या ठेकेदाराकडून आडत्यांना मेसेज पुरवण्याची सुविधा पुरवली जाईल. तसेच आवक नोंदबाबत तपासणी केली जाईल. – डॉ.राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे.
Comments are closed.