‘रामायण’च्या टीझरमध्ये यशचा बोलबाला… तीन सेकंदाच्या दृश्यात रावणाने भाव खाल्ला
बहुचर्चित रामायण या चित्रपटाचा टीझर अखेर सर्वांसमोर आला आहे. नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. भक्तिपूर्ण आणि भावनिक रामायणाच्या पहिल्या झलकने लोक मंत्रमुग्ध झाले आहेत. २ मिनिटे ३८ सेकंदांच्या या टीझरमध्ये रणबीर कपूरच्या अलौकिक रामाची झलक पाहायला मिळते. हनुमान जयंतीच्या निमित्ताने रामायणाची इतकी भव्य झलक पाहून लोक आनंदित झाले आहेत. टीझरमध्ये रणबीर कपूरशिवाय इतर कोणत्याही अभिनेत्याचा चेहरा दिसत नाही. फक्त सनी देओलचा ‘राम’ म्हणण्याचा आवाज ऐकू येतो.
लक्ष्मणाच्या भूमिकेत रवी दुबे आणि सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी यांची अस्पष्ट झलक दिसते. टीझरचा शेवट रावणाच्या भूमिकेतील यशच्या एका झलकने होतो, ज्यामुळे चाहते थक्क झाले आहेत. काळ्या रंगाचे कपडे घातलेला, उंच आणि मुकुट परिधान केलेला यश मागून तल्लीन अवस्थेत चालताना दिसतो. या दृश्यात त्याचे पुष्पक विमानही दाखवले आहे. टीझरमध्ये यशचा चेहरा दिसत नसला तरी, यशने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे आणि चाहत्यांना मोहित केले आहे.
Comments are closed.