IPL 2026 – पहिल्या षटकाचा नवा बादशहा, मोहम्मद शमीच्या वेगवान माऱ्याने विक्रम प्रस्थापित
हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने IPL 2026 मध्ये एक ऐतिहासिक कामगिरी करत आपले नाव सुवर्णअक्षरात कोरले आहे. आयपीएलच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक वेळा विकेट घेण्याचा विक्रम आता शमीच्या नावावर झाला आहे. या विक्रमासह शमी लीगच्या इतिहासातील सर्वात घातक गोलंदाज म्हणून समोर आला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने एक विकेट घेतली होती.
शमीने आतापर्यंत तब्बल पाच वेळा डावाच्या पहिल्याच चेंडूवर फलंदाजाला बाद करण्याचा पराक्रम केला आहे. यासह त्याने प्रवीण कुमार आणि ट्रेंट बोल्ट सारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. या यादीत शमी पहिल्या स्थानावर असून, त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आठ गोलंदाज आहेत ज्यांनी प्रत्येकी तीन वेळा असा पराक्रम केला आहे. यामध्ये लसिथ मलिंगा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि पॅट कमिन्स यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.
9 लाखांची सोनसाखळी कोणाची? क्रिकेटपटूचा आरोप अन् अभिनेत्रीला अटक
सुरुवातीच्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला पहिला झटका देण्यात शमीचा हात कोणीही धरू शकत नाही, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जोफ्रा आर्चर, दीपक चहर आणि झहीर खान यांसारख्या खेळाडूंनी हा पराक्रम दोनदा केला आहे, मात्र शमीने पाचवेळा ही किमया साधून आपला दबदबा निर्माण केला आहे. नव्या चेंडूवर नियंत्रण आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे तो आज आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.
Comments are closed.