देवभूमी हादरली! आळंदीत 6 वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळला, 79 वर्षीय वृद्ध महिलेलाही वार करुन संप

आळंदी : वारकरी संप्रदायाची पावन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदीत एक धक्कादायक घटना घडली आहे. केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी येथे एका ६ वर्षांच्या चिमुरडीची गळा (Alandi Crime News) आवळून, तर तिला सांभाळणाऱ्या ७९ वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात वार करून निर्घृण हत्या (Alandi Crime News) करण्यात आली आहे. काल (बुधवारी, ता 1) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Alandi Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमानवाडी येथील रहिवासी संगीता दत्तात्रय गवारी या नेहमीप्रमाणे केळगाव येथील इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये हाऊस कीपिंगच्या कामासाठी रात्रपाळीला गेल्या होत्या. घरी त्यांची नात धनश्री सोनू दत्तात्रय केदारी (वय ६ वर्षे) आणि तिला सांभाळण्यासाठी शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७९ वर्षे) या दोघीच होत्या. मध्यरात्री अज्ञात इसमाने (Alandi Crime News) घरात शिरून गाढ झोपेत असलेल्या धनश्रीचा गळा आवळला, तर मंगल शिंदे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून दोघांचीही हत्या केली.(Alandi Crime News)

गुरुवारी सकाळी संगीता गवारी या कामावरून घरी परतल्यानंतर हा भीषण प्रकार उघडकीस आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून त्यांनी आरडाओरडा केला, त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुहेरी हत्याकांडामागील नेमका उद्देश काय ? चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला की काही जुन्या वादातून, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे आळंदी आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.(Alandi Crime News)

या दुहेरी हत्याकांडामुळे आळंदी परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, वारकरी संप्रदायाची पावन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदीत अशा प्रकारची क्रूर घटना घडल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यासोबतच संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून, आरोपीचा लवकरात लवकर माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेमागे चोरीचा हेतू होता की पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला, याचा सखोल तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केली असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.(Alandi Crime News)

आणखी वाचा

Ashok Kharat Case Nashik Crime News: पिंक टी-शर्ट, वाढलेली दाढी अन् स्क्रीनवर ‘भोंदू’ खरात; VC सुनावणीत सरकारी वकिलांनी मांडला क्रूरतेचा पाढा, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.