सर्वोत्कृष्ट हर्बल हेअर स्प्रे





केसांची निगा राखण्यासाठी नारळाचे तेल जितके महत्वाचे तितकेच महत्वाचे असते केसांवर हर्बल स्प्रे मारणे. त्यामुळे केसांचा गुंता होत नाही आणि केस कोरडे होत नाहीत. केस चमकदार होतात. हेल्थी राहतात. कारण या स्प्रेमधून केसांना आवश्यक घटक मिळतात. कोणते आहेत हे स्प्रे ते बघूया.

सुवासिक पानांचे एक सदाहरीत झुडुप
हा स्प्रे बनवण्यासाठी १ मोठा चमचा ड्राय रोझमेरी घ्या. १ लिटर पाण्यात ती उकळून घ्यावी. पाणी अर्धा लीटर होईपर्यंत ते आटवावे. हे मिश्रण थंड झाल्यावर स्प्रे बाटलीत भरावे.

अॅलोव्हेरा
अॅलोव्हेरा स्प्रे बनवण्यासाठी ३ मोठे चमचे हेजल, १ मोठा चमचा अॅलोव्हेरा जेल,१५ थेंब रोझमेरी तेल, ५ थेंब, लेवेंडर तेल,५ थेंब लेमन तेल, हे सगळे एकत्रित करून बाटलीत भरावे. दिवसातून दोन वेळा केसांवर स्प्रे करावे.

तांदूळ पाणी
केसांच्या वाढीसाठी हा स्प्रे महत्वाचा आहे. त्यासाठी एका वाटीत २ मोठा चमचे तांदूळ धुवून भिजत ठेवावे. सकाळी त्यातील तांदूळ गाळून घ्यावे. नंतर तांदळाच्या पाण्यात काही थेंब टी ट्री इसेंनशियल तेल टाकावे. हे मिश्रण बाटलीत भरून ठेवावे. केस धुण्याच्या १० मिनिट आधी केसांवर स्प्रे करावे.

मेथी-गुलाब पाणी
केसांच्या वाढीसाठी मेथीदाणे फायदेशीर असतात. त्याचा स्प्रे बनवण्यासाठी १ मोठा चमचा मेथीदाणे,१ मोठा चमचा गुलाबजल, १ मोठा चमचा काळे तीळ घ्यावे. अर्धा लीटर पाण्यात मेथीदाणे आणि काळेतीळ उकळून घ्यावे. मिश्रण थंड झाले की त्यात गुलाबजल टाकून बाटलीत भरावे. आठवड्यातून दोनदा रात्री झोपताना केसांच्या मूळाशी स्प्रे करावा.



Comments are closed.