Summer Fashion : उन्हाळ्यात पिकनिकला ट्राय करा हे कपडे, दिसाल कमाल




समेसाठी फॅशन टिप्स


उन्हाळ्यात शाळांच्या सुट्ट्या सुरू झाल्या की कुटूंबात एखाद्या पिकनिकचे आयोजन करण्यास सुरूवात होते. पिकनिक म्हटले की घरातील बच्चेकंपनीपासून ते महिलांपर्यत सर्वंजण कपड्यांची खरेदी करतात. परंतू, उन्हाळ्यात कपडे खरेदी करताना विशेषत: पिकनिकसाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हवेत, जेणेकरून तुम्हाला या दिवसातही एन्जॉय करू शकता. आज आम्ही तुम्हाला समर पिकनिकसाठी महिलांसाठी असणारी काही हलकेफुलके कपड्यांचे ऑप्शन सांगणार आहोत.

ओव्हरसाईज टी शर्ट

सध्या ओव्हरसाईज टी शर्ट चा ट्रेंड सुरू आहे. हा ट्रेंड उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट आहे. ओव्हरसाईज टी शर्ट आकाराने मोठे असल्याने घाम आल्यावर अंगाला चिकटत नाही. फक्त तुम्ही कपडा कोणता घेता त्यावर हे अवलंबून आहे. उन्हाळ्यात कॉटन चे टी शर्ट घेण्यास प्राधान्य द्यावे.

कॉर्ड सेट

तुम्ही उन्हाळ्यात पिकनिकसाठी स्लिव्हलेज प्रकाराताली कॉर्ड सेटसुद्धा ट्राय करू शकता. बाजारात या कॉर्ड सेटचे विविध प्रकार मिळतात. तुम्ही आवडीनुसार खरेदी करू शकता.

ऑफ शोल्डर प्रिंटेड ड्रेस

पिकनिक स्पॉटवर तुम्हाला वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढायचे असतील तर ऑफ शोल्डर प्रिंटेड ड्रेस हा पर्याय उत्तम आहे. अशा पद्धतीचे ड्रेस साधारणपणे बाजारात कमीत कमी 300 ते 400 रुपयांपासून मिळतात.

टॉप आणि स्कर्ट

पिकनिकसाठी टॉप आणि स्कर्ट हा पर्याय देखील उत्तम आहे. तुम्ही कॉटन, होजियारी किंवा क्रेप कापडाचे हे कपडे ट्राय करू शकता. घेरदार स्कर्ट तर उन्हाळ्यासाठी आरामदायी आहे.

हेही वाचा – पोल्का डॉट टॉप्स: समर स्पेशल पोल्का डिझाइन क्रॉप टॉप; तुम्हाला क्लासी लुक मिळेल



Comments are closed.