कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यासाठी तयार राहा, इराणच्या लष्करप्रमुखांनी सैनिकांना सतर्क राहण्याचे दिले आदेश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्यपूर्वेतील वाढता तणाव लक्षात घेता, इराणने आपल्या लष्करी हालचाली तीव्र केल्या आहेत. इराणचे लष्करप्रमुख मेजर जनरल अमीर हातामी यांनी अमेरिकेसह इस्रायलला कडक शब्दांत इशारा दिला असून, कोणत्याही संभाव्य हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या सैन्याला पूर्णपणे तयार आणि सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

इराणच्या लष्करी तळांना भेट देताना जनरल अमीर हातामी म्हणाले की, “इराणच्या सार्वभौमत्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे परिणाम गंभीर होतील. आमच्या शत्रूंनी हे लक्षात ठेवावे की, आम्ही कोणत्याही आक्रमणाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत. सैनिकांनी डोळ्यात तेल घालून सीमांचे रक्षण करावे आणि कोणत्याही क्षणी कारवाईसाठी तयार राहावे.”

दरम्यान, गेल्या काही दिवसांत झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर, इराण आता मोठ्या लष्करी कारवाईच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. जनरल अमीर हातामी यांच्या या इशाऱ्यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आंतरराष्ट्रीय समुदाय या घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Comments are closed.