विनय मांडके यांचे निधन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सात हजारांहून अधिक जिंगल्स आणि दीडशेहून अधिक चित्रपटांसाठी पार्श्वगायक करणारे प्रसिद्ध गायक विनय मांडके यांचे बुधवारी अल्पशः आजाराने निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी दादर येथील घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. विनय मांडके यांनी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. ‘लक्ष्याचा आवाज’ अशी त्यांची ओळख होती, तर ‘हमारा बजाज’सारख्या लोकप्रिय जिंगल्समुळे ते घराघरांत पोहोचले होते. ऑर्पेस्ट्राच्या माध्यमातूनही त्यांनी संगीत रसिकांना निखळ आनंद दिला. मांडके यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

सी. रामचंद्र, ओ. पी. नय्यर, रवी, शंकर-जयकिशन, कल्याणजी आनंदजी, बप्पी लाहिरी यांसारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांसाठी थेट कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. पुढे जाहिरात आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी चमकदार कामगिरी केली.

Comments are closed.