‘आप’ने राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवल्यानंतर राघव चड्डा यांची पहिली पोस्ट; ‘इव्हिल आय’ इमोजीसह

राघव चढ्ढा: आम आदमी पार्टीने (AAP) राज्यसभेत मोठा संघटनात्मक बदल केला आहे. पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्डा (Raghav Chadha) यांना राज्यसभेतील पक्षाच्या उपनेते पदावरून हटवण्यात आले असून, त्यांच्या जागी आता अशोककुमार मित्तल यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या बदलानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच, राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.

Raghav Chadha: ‘इव्हिल आय’ इमोजी आणि संसदेतील कामगिरीचा व्हिडिओ

उपनेते पदावरून हटवल्यानंतर राघव चड्डा यांनी ‘X’ (ट्विटर) वर 2 मिनिटे 45 सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘इव्हिल आय’ या इमोजीचा वापर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी अलीकडच्या काळात संसदेत सर्वसामान्यांच्या हितासाठी उठवलेल्या आवाजाची झलक दाखवली आहे. मध्यमवर्गीयांवरील कराचा बोजा, मोबाइल रिचार्जमधील 28 दिवसांचा ‘स्कॅम’,इन्कमिंग कॉल चार्जेस आणि डेटा एक्स्पायरी समस्या, पेपर लीक प्रकरण आणि हवाई प्रदूषणाचा प्रश्न, आरोग्य विम्यावरील GST आणि विमानतळावरील महागडे खाद्यपदार्थ, पॅटर्निटी लीव (पितृत्व रजा) आणि बँकांमधील मिनिमम बॅलन्स दंड, अशा प्रमुख मुद्द्यांचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.

अशोक मित्तल: ही एक सामान्य प्रक्रिया आहे: अशोक कुमार मित्तल

दरम्यान, पक्षाने दिलेली नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर अशोक कुमार मित्तल यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “हा बदल एक सामान्य प्रक्रियेचा भाग असून यामागे कोणतेही विशेष कारण नाही. आज माझी निवड झाली आहे, उद्या दुसऱ्या कोणाची होईल.” तसेच, राघव चड्डा हे पक्षाचे ज्येष्ठ खासदार असून त्यांच्याकडून जे काही शिकलो, ते पुढे नेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. “जी माहिती द्यायची होती, ती राज्यसभा सचिवालयाला कळवण्यात आली आहे,” असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर संक्षिप्त प्रतिक्रिया दिली.

राघव चढ्ढा : राघव चढ्ढा यांचा धाकटा भाऊ राज्य मुक्काम

राघव चड्डा हे आम आदमी पार्टीच्या तरुण आणि आक्रमक नेत्यांपैकी एक मानले जातात.

2020 – 2022: दिल्ली विधानसभेचे सदस्य (आमदार).

दिल्ली जल बोर्ड: सदस्य म्हणून कामाचा अनुभव.

एप्रिल 2022: पंजाबमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड.

आणखी वाचा

Raghav Chadha: देशातील महागाईनं पिचलेल्या ‘आम आदमी’च्या ज्वलंत मुद्यावरून संसदेत रान उठवणाऱ्या खासदार राघव चड्ढांवर पक्षाचा थेट सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय? अजूनही दोन वर्ष खासदारकी

आणखी वाचा

Comments are closed.