महत्त्वाच्या बातम्या – नेरुळ येथील सेक्टर १८ मधील गंगोत्री सोसायटीमध्ये हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हनुमान जयंती

नवी मुंबई : नेरुळ येथील सेक्टर १८ मधील गंगोत्री सोसायटीमध्ये हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली. गणेश मिस्त्री यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भावना खिस्ते, वंदना शिंदे, कविता पाटील, शोभा औटी, सुरेखा सरंबळे यांनी हनुमान जन्माचा पाळणा गायला. विनायक सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. उत्सव यशस्वी करण्यासाठी रामदास शिंदे, संजय धनावडे, अनिल औटी, चंद्रकांत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

ठाणे: दिवा परिसरातील बाबुराव रेसिडेन्सी इमारतीच्या एका सदनिकेत शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारतीच्या सदनिका १०३ मध्ये सुशील मेस्त्री हे भाड्याने राहतात. किचनमधील विद्युत बोर्डमध्ये शॉर्टसर्किट होऊन फ्रीजला आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी वित्तहानी टळली.

घरफोडी
पनवेल शहरातील पुष्पकनोड परिसरात झालेली घरफोडी इमारतीच्या सुरक्षारक्षकानेच केल्याचे समोर आले आहे. सेक्टर आर ४ मधील सिद्धिविनायक व्हिला येथे सुमारे ४० लाखांच्या ऐवजाची चोरी झाली होती. घर बंद असल्याचा फायदा घेऊन सुरक्षारक्षकानेच मुद्देमाल चोरून नेला. टेरेसवरून रस्सीच्या सहाय्याने त्याने घरात प्रवेश केला होता.

Comments are closed.