भाजप आमदाराच्या भावाला अपघाताचा बनाव रचत संपवण्याचा कट, बच्चू कडूंवर अमरावतीमध्ये गुन्हा दाखल

बच्चू कडू न्यूज अमरावती : अमरावतीच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर  आली आहे. प्रहार संघटनेचे सर्वेक्षणते सर्व आणि माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर अपघात भासवून भाजप (BJP) आमदाराच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप (Amravati Crime) करण्यात आला आहे. याप्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांकडून (Amravati Police) चांदूर बाजार येथे बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्हे दाखल केले आहेत. परिणामी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर खुनाचा कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amravati Crime News : रस्ते अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसारअचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांच्या तक्रारीवरून माजी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बच्चू कडू, गोलू माहुरे आणि आणखी एका व्यक्तीवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. आमदार प्रवीण तायडे यांनी त्यांचे चुलतभाऊ अभिजीत तायडे यांच्यावर रस्ते अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप केलाहे. तक्रार आणि पेन ड्राइव्हच्या प्राथमिक तपासानंतर चांदूर बाजार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर चांदूर बाजारसह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय आहे? (बच्चू कडू विरुद्ध प्रवीण तायडे)

मिळालेल्या माहितीनुसारतक्रारदार आणि भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे सख्खे बंधू अभिजित तायडे यांनी या प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांत माजी आमदार बच्चू कडू, गोलू माहुरे आणि आणखी एका व्यक्तीवर गंभीर आरोप केलेत आणि रीतसर तक्रार नोंदवली आहे. अभिजित तायडे हे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे सख्खे बंधू आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी शुभम उर्फ गोलू माहोरे यांनी मिळून अभिजित तायडे यांच्या हत्येचा कट आखला होता. घातपात घडवून हा एक अपघात असल्याचा बनाव करून त्यांना संपवण्याचा हा प्रयत्न होता, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता तक्रार नोंदवत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असूनाही या प्रकरणाने जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.