TRPवर ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चा कब्जा, नव्या शोच्या एन्ट्रीने ‘अनुपमा’ची झाली दयनीय अवस्था? – Tezzbuzz
टेलिव्हिजन विषयामध्ये अशा अनेक मालिका आहे ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. अशीच एक सिरीयल म्हणजे अनुपमा आहे तर या सिरीयल बाबत सध्या चर्चा सुरू आहे. ते म्हणजे अलीकडच्या टीआरपी अहवालात अनेक नवीन बदल समोर येत आहेत. आणि त्यामुळे या ‘अनुपमा’च्या रेटिंगमध्ये घट झाली आहे. स्मृती इराणी यांची लोकप्रिय मालिका ‘क्योंकी सास भी कभी बहू थी 2’ ने या आठवड्यात आपले स्थान निर्माण केले आहे. परिणामी, एकता कपूरच्या या दोन मालिकांनी इतर सर्व मालिकांना मागे टाकले असून, त्यांना कडवी टक्कर दिली आहे.
‘क्योंकी सास भी कभी बहू थी 2’ ने 2026 मध्ये आपली पकड कायम ठेवली आहे. त्याची स्पिन-ऑफ, ‘क्योंकी रिश्तों के भी रूप बदलते हैं’, हिच्या लोकप्रियतेत थोडी घट झाली, पण तिने गेल्या आठवड्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘अनुपमा’ला मागे टाकले. टीआरपीमध्ये थोडी घट झाल्यानंतर, 12व्या आठवड्यात ती तिसऱ्या स्थानावर घसरलेली दिसुन येत आहे.
तर या टाॅप 5 मध्ये ‘तुम से तुम तक’ने आपल्या टीआरपी रेटिंगमध्ये लक्षणीय वाढ नोंदवत दुसरे स्थान पटकावले. अनुपमा, ही मालिका सहसा पहिल्या तीनमध्ये राहते आणि इतर मालिकांना टक्कर देते, पण ती तिच्या कथानकामुळे प्रेक्षकांना भावत नाहीये. यामुळेच रुपाली (rupali)गांगुलीची सर्वात लोकप्रिय मालिका चौथ्या स्थानावर घसरली आहे. तिच्या पाठोपाठ पाचव्या स्थानावर ‘गंगा मैं की बेटियां’ आहे, जी सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
या अभिनेत्याचे लिगामेंटमध्ये दुखापत असूनही थांबले नाहीत पाय, एका पायावर पूर्ण केला होता डान्स
Comments are closed.