Pregnancy Problem : तिशीनंतर गर्भधारणेत अडचणी का येतात?




तिशीनंतर गर्भधारणेत अडचणी का येतात?


हल्ली मुली करिअरकडे अधिक गांभीर्याने पाहत असल्याने अगदी 30 ते 32 वयानंतर लग्न करण्याचा निर्णय घेत आहेत. या निर्णयामुळे एखाद्या मुलीचं लग्न वयाच्या तिशीनंतर झाल्यावर गर्भधारणेचा निर्णय लग्नानंतर 2 ते 3 वर्षानंतर घेण्यात येतो. मात्र या सगळ्यात मुलीचे वय वाढत जाते आणि त्यामुळे गर्भधारणा होण्यास अडचणी येतात. हल्ली तिशीनंतर आई होण्याचा निर्णय घेतल्याने प्रेग्नेन्सी आणि बाळाच्या जन्मादरम्यान अडचणी आल्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. आजच्या लेखात तिशीनंतर गर्भधारणेत अडचणी का येतात? त्यामागील सामान्य कारणे कोणती आहेत? हे जाणून घेऊयात.

तज्ज्ञांच्या मते महिलांच्या फर्टिलिटीचा प्रवास त्यांच्या जन्मापासूनच सुरू होतो. जेव्हा एखादी मुलगी आपल्या आईच्या गर्भात असते तेव्हाच तिच्या ओव्हरीजमध्ये अंड्याची संख्या लाखोंमध्ये असते. त्यानंतर जसजसे वय वाढत जाते तसे महिलांची फर्टिलिटी हळूहळू कमी होत जाते.

मूल होऊ न देणे हा सर्वस्वी त्या जोडप्याचा प्रश्न असला तरी त्यासाठी फार उशीर न करणे योग्य. अन्यथा शुगर, बीपी यांसारख्या समस्या सुरू होतात.

तिशीनंतर मूल होऊ दिल्यास या मुलामध्ये congenital anomalies होण्याची दाट शक्यता असते. यामुळे मूल अबर्नॉमल होऊ शकते. मूलात शारीरिक व्यंगता असू शकते.

वयाच्या 35 नंतर मूल जन्माला घालण्याचा विचार केल्यास महिलांमध्ये ऍक्टोपिक प्रेगेन्सीचा धोका उद्भवतो. या समस्येमध्ये गर्भधारणा गर्भाशयात न होता उजव्या किंवा डाव्या अंडवाहिनीमध्ये होते, जेथे गर्भाची वाढ होणे अशक्य असते. त्यामुळे बहुतेकवेळा अशा केसेसमध्ये गर्भपात होऊ शकते.

30 ते 32 वयानंतर गर्भधारणेत वयोमानानुसार प्रसूती दरम्यान गुंतागुंत वाढून सिझेरियन सेक्शनची गरज भासू शकते.

हेही वाचा – Vaginal Dryness : व्हजायनल ड्रायनेसची कारणे कोणती?



Comments are closed.