अबू धाबीत क्षेपणास्त्र हवेतच नष्ट, कोसळलेल्या ढिगाऱ्यामुळे ५ हिंदुस्थानींसह १२ जण जखमी
संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबू धाबी येथील अजमान (Ajban) भागात शुक्रवारी हवाई संरक्षण यंत्रणेने एक क्षेपणास्त्र (Projectile) यशस्वीपणे हवेतच रोखले. मात्र हे क्षेपणास्त्र रोखल्यानंतर याचे अवशेष निवासी भागात कोसळल्याने १२ जण जखमी झाले आहेत. यामध्ये ५ हिंदुस्थानी नागरिकांचा समावेश असल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ दिले आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत जखमी झालेल्या पाचही हिंदुस्थानी नागरिकांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींमध्ये हिंदुस्थानींव्यतिरिक्त सात नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. त्यापैकी सहा जणांना किरकोळ दुखापत झाली असून, एका नेपाळी नागरिकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर काही तासांतच त्याच भागात ढिगारा पडल्यामुळे एका गॅस केंद्रला आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हवाई संरक्षण यंत्रणेने वेळीच शत्रूचे लक्ष्य नष्ट केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली, तरी कोसळलेल्या ढिगाऱ्यामुळे ही हानी झाली आहे.
Comments are closed.