IPL 2026: वैभव सूर्यवंशीपासून आयुष म्हात्रेपर्यंत 'ऑरेंज कॅप' जिंकू शकतात हे 5 युवा खेळाडू! शर्यतीत कोण आघाडीवर?
आयपीएल 2026 (Indian premiere league) मध्ये आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंनी आपली चमक दाखवली आहे. यंदाच्या हंगामात तरुण खेळाडूंचा दमदार फॉर्म पाहायला मिळत असून 5 असे युवा खेळाडू आहेत, जे ‘ऑरेंज कॅप’वर (सर्वाधिक धावा) कब्जा करू शकतात.
या यादीत पहिलं नाव समीर रिझवीचं (Sameer Rizvi) आहे, ज्याने आतापर्यंत एका सामन्यात 70 धावा केल्या आहेत. याशिवाय प्रियांश आर्या (Priyansh Arya) देखील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सुद्धा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत असून त्याने पहिल्याच सामन्यात CSK विरुद्ध अवघ्या 17 चेंडूत 52 धावांची तुफानी खेळी केली होती.
तसेच, केकेआरचा फलंदाज अंगकृष रघुवंशी याने 2 सामन्यांत 103 धावा केल्या आहेत. तर शेवटचं नाव म्हणजे CSK चा युवा स्टार आयुष म्हात्रे, जो या हंगामात ऑरेंज कॅप जिंकण्याचा मोठा दावेदार मानला जात आहे.
Comments are closed.