प्रत्येकीकडे असायलाच हव्यात या ‘हेअर एक्सेसरीज’





सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी मेकअप, छान ड्रेसेस, साड्या नेसणं जितकं महत्वाचं तितकीच महत्वाची असते हेअरस्टाईल. पण नुसती हेअरस्टाईल केल्याने लूक पूर्ण होत नाही तर त्यासाठी तुम्ही कोणती हेअर एक्सेसरीज कॅरी केली आहे तेही महत्वाचं. या हेअर एक्सेसरीज म्हणजे केस आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही त्यावर ज्या काही सुंदर क्लिप्स, फूल लावली आहेत त्या सजावटीच्या वस्तू.

क्लिप

हेअर एक्सेसरीजमुळे केसांना छानसा लूक मिळतो. बाजारातही वेगवेगळ्या आकाराच्या रंगाच्या आकर्षक क्लिप मिळतात. लहान मुलींच्या केसांवरही अशा क्लिप्स छान दिसतात. तसेच महिला व तरुणींच्या केंसांसाठीही मोती स्टोनच्या क्लिप्स उपलब्ध आहेत. तुम्ही आंबाडा घातला किंवा केस मोकळे सोडले तरी त्यावर अशा क्लिप्स आकर्षक दिसतात.

बँड्स
बाजारात विविध प्रकारचे हेअर बँड दिसतात. यात झिकझॅक आकार असलेले, एका बाजूला मोठाले फूल असलेले विविध रंगाचे बँड्स केसांवर लावल्यास केस छान दिसतात.

स्क्रंचीज

काही वर्षांपूर्वी महिला केस बांधण्यासाठी रबर बँड वापरायच्या . पण त्यात केस गुंतून तुटायचे. त्यामुळे हेअर बँड काढण हे महिलांसाठी डोकेदुखीचे कारण होते. पण आता हेअर बँडच्या जागी स्क्रंचीज वापरले जातात. रबर बँडला सिल्क गुंडाळेले हे स्क्रंचीज वापरायला सोपे आणि स्वस्तही असतात. तसेच यामुळे केसही तुटत नाहीत. त्यामुळे सगळ्याच महिलांच्या पर्समध्ये स्क्रंचीज दिसतात. आंबाड्याभोवतीही स्क्रंचीज गुंडाळले की आंबाडा अधिक खुलुन दिसतो. त्यातच हे स्क्रंचीज विविध रंगात उपलब्ध असतात. त्यामुळे साडी, ड्रेसेसवर सहज मॅच करता येतात.

क्राऊन्स, टियारा
जर तुम्हाला लग्नसमारंभ, पार्टीला जायचे असेल तर तुम्ही केसांना टियारा किंवा क्राऊनने डेकोरेटीव्ह लूक देऊ शकता.



Comments are closed.