अर्थवृत्त – डंकिन डोनट्स गाशा गुंडाळणार!
अमेरिकी फूड ब्रँड डंकिन डोनट्सने हिंदुस्थानातला प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पंपनीचे हिंदुस्थानातील पार्टनर जुबिलेंट फूडवर्क्स लिमिटेडने फ्रेंचाइजी करार पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे डंकिन डोनट्सचा प्रवास संपणार आहे. या दोन पंपन्यांतील करार 31 डिसेंबर 2026 ला संपणार आहे. यानंतर हिंदुस्थानात पसरलेले डंकिन डोनट्सचे स्टोअर्स हळूहळू बंद केले जातील. जुबिलेंट फूडवर्क्स लिमिटेडला आता मुख्य ब्रँड्स आणि प्रमुख बाजारपेठांवर पह्कस करायचा आहे. बोर्डाच्या मंजुरीनंतर आणि अधिकृत फायलिंगनंतर डंकिन संबंधित व्यापार बंद करण्याचा निर्णय पंपनीने घेतला आहे. आगामी काळात स्टोअर्सला हळूहळू बंद केले जाईल. तसेच या बिझनेसमध्ये अपेक्षित यश न आल्यामुळेही हा करार संपवला जात असल्याचे बोलले जात आहे. डंकिनचे स्टोअर्स एकाचवेळी बंद केले जाणार नाहीत. हळूहळू ऑपरेशन कमी केले जातील. काही ठिकाणी दुकाने पूर्ण बंद केले जातील. काही स्टोअर्स ट्रान्सफर करणे आणि फ्रेंचाइज राइट्सला समावेश करणे, यासारखी कामे केली जातील. ही संपूर्ण प्रक्रिया नियमांनुसार होईल. डंकिनचे ब्रँड मालका सोबत मिळून केली जाईल. जुबिलेंट फूडवर्क्स लिमिटेडची सुरुवात 1995 मध्ये करण्यात आली होती. आज हिंदुस्थानसह तुकाa, बांगलादेश, श्रीलंका, अझरबैजान आणि जॉर्जिया या देशात 3500 हून अधिक स्टोअर्स आहेत.
टकॉलरचे युजर्स 500 दशलक्ष पार
टकॉलरने जागतिक युजरसंख्येने 500 दशलक्षचा टप्पा ओलांडला आहे. या प्लॅटफॉर्मवरील युजर्सची संख्या सातत्याने वेगाने वाढत असून केवळ 2025 या वर्षातच 50 दशलक्षांहून अधिक नवीन युजर्स यात सामील झाले आहेत. भारतात टकॉलर वापरणाऱयांची संख्या 350 दशलक्षांहून अधिक झाली असून भारताबाहेरील युजर्सची संख्या 150 दशलक्षांपेक्षा जास्त आहे. अनाहूत कॉल्स, स्पॅम आणि फसवणूक यांपासून संरक्षणाची गरज जागतिक स्तरावर वाढत असल्यामुळे ही वाढ होत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला पंपनीच्या पेड सेवांचा लाभ घेणाऱया सबस्क्रायबर्सची संख्यादेखील चार दशलक्षांहून अधिक झाली असून त्यामुळे पंपनीच्या महसूल स्रोताला आणखी बळकटी मिळाली आहे.
लाइट स्टाईल पीएनजीचा विस्तार
दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेला लाइटस्टाईल बाय पीएनजी ब्रँड मुंबईत आपला विस्तार केला आहे. ब्रँडने घाटकोपर आणि मुलुंड येथे दोन नवीन स्टोअर्स सुरू केली आहेत. घाटकोपरमधील स्टोअर वल्लभ विहार, राजावाडी कॉलनी, आणि मुलुंडमधील स्टोअर एलबीएस मार्ग, येथे सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी ग्राहकांना कमी वजनातील, ट्रेंडी आणि रोजच्या वापरासाठी योग्य अशा दागिन्यांची विविधता अनुभवता येणार आहे. या नव्या स्टोअर्समध्ये सोन्याचे आणि डायमंडचे कमी वजनाचे, सुंदर आणि नव्या पिढीच्या पसंतीचे डिझाइन्स सादर करण्यात आले आहेत.
ईसीएएमचे प्रदर्शन
ईसीएएमईएक्स अर्थात इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ईसीएएम)ने 2026 च्या दुसऱया आवृत्तीची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम 4 ते 6 एप्रिल रोजी मुंबई एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे होणार आहे.
एडल्ट डायपर पँट
एजीइझी या ब्रँडने स्मार्ट लिक्विड डिस्ट्रिब्युशन टेक्नॉलॉजी असलेले एडल्ट डायपर सादर केले. ज्येष्ठ नागरिकांना लघवीवर नियंत्रण ठेवणे अवघड जाते. त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट चांगले आहे असा दावा पंपनीने केला आहे.
सेनचे सोने बोरिवलीत
प्रसिद्ध दागिन्यांचा ब्रँड ‘सेनको गोल्ड अँड डायमंड्स’ने मुंबईतील विस्ताराचा नवा टप्पा गाठला आहे. बोरिवली येथील स्काय सिटी मॉलमध्ये ब्रँडच्या सहाव्या स्टोअरचे उद्घाटन पार पडले. अभिनेत्री वामिका गब्बी हिच्या हस्ते शोरूमचे लोकार्पण करण्यात आले.
डॉलर वेव्ह पंप
डॉलर लहरने या उन्हाळय़ात आपल्या नव्या पॅम्पेनद्वारे विनोद, कल्पनाशक्ती आणि अनपेक्षित साय-फाय ट्विस्टचा अनोखा संगम सादर केला आहे. यात अभिनेता सैफ अली खान आहे. यावेळी एमडी विनोद कुमार गुप्ता उपस्थित होते.
1 मध्ये जिलेट गार्ड 3 लाँच केले
जिलेट इंडियाने अभिषेक शर्मा यांच्या सहकार्याने नवीन जिलेट गार्ड 3-इन-1 सादर केले. अभिषेक शर्मा या उत्पादनाचा ब्रँड अॅम्बेसेडर असून तो ‘बडे लीग का शेव्ह’मोहिमेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आज प्रत्येक तरुण खेळ, करिअर पुढच्या स्तरावर पोहोचण्यासाठी मेहनत करत आहे. माझ्यासाठी ग्रूमिंग महत्त्वाची आहे कारण ती आत्मविश्वास वाढवते, मला ‘मॅचसाठी तयार’ दिसण्यास मदत करते, असे अभिषेक म्हणाला.
निसानच्या देशांतर्गत विक्रीत 98 टक्के वाढ
निसान मोटर इंडिया प्रा. लिमिटेडने (एनएमआयपीएल) मार्च 2026 मध्ये 10,388 गाडय़ांची एकूण विक्री नोंदवत दमदार कामगिरी केली. देशांतर्गत होलसेल विक्री 4408 गाडय़ा होती. ती मागील पाच वर्षातील आतापर्यंतची सर्वाधिक मासिक देशांतर्गत होलसेल विक्री आहे. देशांतर्गत होलसेल विक्रीत फेब्रुवारी 2026 च्या तुलनेत 98 टक्के वाढ नोंदवली आहे.
गोदरेजचा एसी पोर्टपहलिओ सादर
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या अप्लायन्सेस बिझनेसने 2026 साठी आपला अपग्रेडेड आणि भविष्यासाठी सज्ज असा एअर पंडिशनर पोर्टपहलिओ सादर केला आहे. 2026 च्या उन्हाळी पोर्टपहलिओमध्ये 1 टन ते 4 टन क्षमतेपर्यंतचे स्प्लिट एसी, पॅसेट एसी, टॉवर एसी आणि विंडो एसी यांचा समावेश आहे, ज्यात उच्च टनेजच्या मॉडेल्सवर विशेष लक्ष पेंद्रित केले आहे.
Comments are closed.