Nashik accident – दिंडोरीमध्ये भरधाव कार विहिरीमध्ये कोसळली, 5 लहान मुलांसह एकाच कुटुंबातील 9 जणांचा बुडून मृत्यू
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. एका स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमावरून घरी परतत असताना मारूती एक्सएल 6 ही कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या शेतातील विहिरीमध्ये कोसळली. या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 लहान मुलांचाही समावेश आहे.
नाशिक, महाराष्ट्र: दिंडोरी गावात ३ एप्रिलच्या रात्री, कुटुंबातील नऊ सदस्यांना घेऊन जाणारी मारुती एक्सएल कार रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत पडली, त्यात ७-१४ वयोगटातील मुलांसह सर्वांचा मृत्यू झाला. बचाव पथकांनी कार जप्त केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
(स्रोत: पोलीस… pic.twitter.com/TZ7IZ0p6fs
— IANS (@ians_india) 4 एप्रिल 2026
Comments are closed.