गुन्हे वृत्त – दिग्दर्शिकेच्या चांदीच्या विटा चोरीला

दिग्दर्शिकेच्या चांदीच्या विटा आणि रोख रक्कम हॉटेलमधून चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार या सिने दिग्दर्शिका आहेत. गेल्या मार्च 2025 ते मार्च 2026 या काळात त्या पवई येथील एका हॉटेलमध्ये राहत होत्या. त्याने दोन चांदीच्या विटा खरेदी केल्या होत्या. त्याने त्या विटा बॅगेत ठेवल्या होत्या. गेल्या महिन्यात त्याला पैशाची गरज असल्याने बॅग तपासली. तेव्हा बॅगेत 2 चांदीच्या विटा आणि रोख रक्कम 1 लाख 30 हजार रुपये मिळून आले नाही. याची माहिती तिने हॉटेलच्या मॅनेजरला दिली.

त्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये हॉटेलमधील एक कर्मचारी हा बॅगेतून चांदीच्या विटा काढून घेत असल्याचे दिसले. त्यानंतर तो हॉटेलचा कर्मचारी हा तेथून पळून गेला. त्याला हॉटेलच्या मॅनेजरने संपर्क केला. त्याचा पह्न बंद येत होता. घडल्या प्रकरणी त्याने पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

वृद्धेचे दागिने पळविणाऱ्या महिलांना अटक

वृद्ध माणूस महिलेचे दागिने चलाखीने पळवणाऱया चार महिलांना डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली. सुशीला शिंदे, दामिनी शाह, रोशनी शिंदे, सोनल मोरे अशी त्या चौघीची नावे आहेत. त्या चौघींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार महिला या सांताक्रुझ येथे राहतात. गेल्या महिन्यात त्या अंधेरी येथे मार्पेटमध्ये आल्या होत्या. तेव्हा अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधील दागिने चोरले होते. दागिने चोरीप्रकरणी त्यांनी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मचिंदर याच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन खोंद्रे, अविनाश दराडे, बोटे, बंगाळे, बाबर, वरे, पोळ, पात्रे, वाकोडे आदींच्या पथकाने तपास सुरू केला.

पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी विरार येथून सुशीला, दामिनी, रोशनी, सोनल या चौघीना ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने कबुली दिली. त्या चौघी मूळच्या नाशिकच्या द्वारकाचे रहिवासी आहेत. हातचलाखीने चोरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या विरोधात सहा ते सात गुह्यांची नोंद आहे.

घरफोडी प्रकरणी एकाला अटक

ज्वेलर्सच्या दुकानात घरफोडी प्रकरणी एकाला जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. अनिल सिंग ऊर्फ त्रिशूलसिंग सुधान असे त्याचे नाव आहे. तक्रारदार या महिला व्यावसायिक आहेत. त्यांचे जोगेश्वरी येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या दुकानात घरफोडी झाली होती. अज्ञात चोरटय़ाने दुकानातून पावणे नऊ लाखांचा ऐवज घेऊन पळ काढला होता. घडल्या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चौघांना अटक केली होती. त्याच्या चौकशीत अनिलचे नाव समोर आले आहे. अनिल हा चार महिन्यांपासून फरार होता.

Comments are closed.